वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्म Truth Social वर एका पोस्टमध्ये अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीबाबत मोठं विधान केलं. त्यांनी म्हटलं की, अमेरिकेची फिल्म इंडस्ट्री इतर देशांनी हिसकावून घेतली आहे, जणू एखाद्या मुलाच्या हातून कँडी काढून घेण्यासारखं आहे.
advertisement
ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियालाही लक्ष्य केलं आणि तेथील राज्य सरकारला “कमकुवत आणि असमर्थ” ठरवलं. त्यांचं म्हणणं आहे की तिथली फिल्म इंडस्ट्री याचा विशेष फटका बसला आहे. या जुन्या प्रश्नावर तोडगा म्हणून ट्रम्प यांनी सर्व परदेशी चित्रपटांवर 100% टॅरिफ लावल्याची घोषणा केली आहे.
या निर्णयाचा मुख्य उद्देश हॉलीवूड चित्रपटांना अमेरिकन बाजारपेठेत चालना देणे हा आहे. मात्र या धोरणाचा फटका भारतीय सिनेमालाही बसणार आहे. कारण हे धोरण सर्व परदेशी प्रोडक्शन्सवर लागू होणार आहे.
भारतीय सिनेमावर परिणाम
भारतीय सिनेमासाठी अमेरिका हा सर्वात महत्त्वाचा परदेशी बाजार आहे. उद्योगातील सूत्रांच्या माहितीनुसार- भारतीय चित्रपटांच्या एकूण आंतरराष्ट्रीय कमाईपैकी जवळपास 30–40% हिस्सा अमेरिकन बॉक्स ऑफिसमधून येतो. विशेषतः तेलुगू सिनेमासाठी अमेरिका हा तेलंगानानंतर दुसरा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय बाजार मानला जातो.
मोठ्या बजेटच्या तेलुगू चित्रपटांची बॉक्स ऑफिस कमाईपैकी जवळपास 25% वाटा अमेरिकेतून मिळतो. अशा चित्रपटांचे सहसा 700–800 सिनेमागृहांमध्ये प्रीमियर केले जाते.
अमेरिकेतील भारतीय चित्रपट
2024 मध्ये भारतीय चित्रपटांनी अमेरिकन बाजारात सुमारे 160–170 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती. त्यातील टॉप कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये :
बाहुबली 2 – $22 मिलियन
काली – $18.5 मिलियन
पठाण – $17.49 मिलियन
RRR – $15.34 मिलियन
पुष्पा 2 – $15 मिलियन
जर 100% टॅरिफ लागू झालं तर या चित्रपटांच्या कमाईवर थेट परिणाम होईल. वितरण करारांमध्ये अडथळे येतील आणि अमेरिकेतल्या रिलीज स्ट्रॅटेजीवर पुन्हा विचार करावा लागेल.
संभाव्य व्यावसायिक आव्हाने
या टॅरिफमुळे भारतीय चित्रपट निर्माते आणि स्टुडिओंना नवीन गुंतवणुकीवर आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीवर पुन्हा विचार करावा लागू शकतो. अमेरिकन बाजारातून होणारी कमाई भारतीय चित्रपटांच्या जागतिक कमाईत मोठा वाटा उचलते. त्यामुळे ही पॉलिसी फक्त महसूलावरच परिणाम करणार नाही तर गुंतवणूकदारांचा विश्वास आणि क्रॉस-बॉर्डर रिलीज स्ट्रॅटेजीवरही मोठं आव्हान निर्माण करेल.
विशेषज्ञांच्या मते- भारतीय सिनेमाला आता स्थानिक वितरण मजबूत करणे, डिजिटल प्लॅटफॉर्मवर भर देणे आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक होईल. भारत आणि अमेरिकेतील फिल्म इंडस्ट्रीमधील हा टॅरिफ व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवर दीर्घकालीन परिणाम करू शकतो.
अमेरिका फर्स्ट धोरणाचा भाग
ट्रम्प यांची ही घोषणा अशा वेळी आली आहे जेव्हा अमेरिकन सरकार "America First" धोरणावर भर देत आहे आणि देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्प याआधीच अनेक देशांमधील व्यापारावर टॅरिफ लावले आहेत, ज्यात भारताचाही समावेश आहे. भारतातून होणाऱ्या आयातीवर सध्या 50% टॅरिफ लागू आहे. त्याशिवाय फार्मा सेक्टरवर वेगळं 100% टॅरिफ लावलं गेलं आहे.