TRENDING:

Donald Trump Resignation: डोनाल्ड ट्रम्प राजीनामा देणार? आज रात्री 11:30 होणार मोठी घोषणा, Body Doubleच्या चर्चेने व्हाईट हाऊस हादरले

Last Updated:

Donald Trump Resignation News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज रात्री 11:30 वाजता मोठी घोषणा करणार असल्याचे व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे. गेल्या आठवडाभरापासून सार्वजनिक ठिकाणी न दिसल्याने त्यांच्या तब्येतीबद्दल आणि राजीनाम्याच्या शक्यतेबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) गेल्या आठवड्यात काही दिवसांसाठी सार्वजनिक कार्यक्रमातून गायब होते. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबद्दल विविध तर्कवितर्क सुरू झाले. आता व्हाईट हाऊसने (White House) माहिती दिली आहे की, ट्रम्प आज रात्री भारतीय वेळेनुसार 11:30 वाजता एक मोठी घोषणा करणार आहेत. या घोषणेमुळे सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. काही लोक म्हणतात की ट्रम्प राजीनामा देणार आहेत. तर काही जण अमेरिकेच्या इतिहासात कधीही न झालेला मोठा निर्णय जाहीर करतील असे भाकीत करत आहेत.

advertisement

ट्रम्प यांच्या घोषणेची वेळ

व्हाईट हाऊसने पत्रकारांना सांगितले की- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता (अमेरिकेच्या वेळेनुसार) म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता एक मोठी घोषणा करणार आहेत. याच घोषणेच्या बातमीमुळे सोशल मीडियावर नवनवीन सिद्धांत (New Theories) समोर येत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून ट्रंप सार्वजनिक ठिकाणी दिसले नसल्याने त्यांच्या तब्येतीबद्दल विविध अफवा पसरत आहेत.

advertisement

ट्रम्प राजीनामा देणार का?

इंटरनेटवर सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे- ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? ही शक्यता काहीशी विचित्र वाटत असली तरी त्यांच्या तब्येतीबद्दलच्या प्रश्नांमुळे या चर्चांना जोर आला आहे. गेल्या शुक्रवारी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #TrumpIsDead आणि #WhereIsTrump? असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले.

advertisement

ट्रम्प २७ ऑगस्ट रोजी झालेल्या व्हाईट हाऊस मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सार्वजनिकरित्या दिसले नव्हते. त्याच बैठकीतील एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात त्यांच्या हातावर जखम दिसत होती. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लीविट यांनी खुलासा केला की- सतत हात मिळवल्याने ट्रम्प यांच्या हातावर हे निशाण आले आहे. पण तरीही अफवा थांबल्या नाहीत. 30 ऑगस्ट रोजी ट्रम्प यांना व्हर्जिनियातील त्यांच्या गोल्फ क्लबमध्ये पाहिले गेले. पण त्यावेळीही इंटरनेटवर ही चर्चा सुरू झाली की- तो माणूस खरे ट्रम्प नसून त्यांचा 'बॉडी डबल' (Body Double) आहे.

advertisement

या दरम्यान ट्रम्प त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' (Truth Social) वर सतत सक्रिय होते. काही लोकांनी गंमतीने लिहिले की- कदाचित आज नवीन राष्ट्राध्यक्षांची घोषणा होणार आहे. तर काही जण म्हणाले की, ट्रम्प आरोग्याच्या कारणांमुळे राजीनामा देतील आणि लगेचच नवीन उपराष्ट्राध्यक्षांची निवड केली जाईल.

टॅरिफशी संबंधित घोषणा असेल का?

ट्रम्प यांची घोषणा व्यापार आणि 'टॅरिफ पॉलिसी' (Tariff Policy) शी संबंधित असू शकते. अलीकडेच ट्रम्प प्रशासनाने भारतावर 50% टॅरिफ लावला होता. त्यापैकी 25% टॅरिफ रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल शिक्षा म्हणून लावला होता. भारताने मात्र या दबावापुढे झुकण्यास नकार दिला.

सोमवारी चीनमधील 'एससीओ समिट' (SCO Summit) दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. या तीन नेत्यांचे मैत्रीपूर्ण फोटो वॉशिंग्टनमध्ये चर्चेचा विषय बनले. या घटनेनंतर काही तासांनी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले की, भारत-अमेरिका व्यापार पूर्णपणे 'एकतर्फी' (One-sided) आहे आणि आता खूप उशीर झाला आहे. अमेरिकेच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प आता भारतातून येणाऱ्या औषधांवरही टॅरिफ लावण्याचा विचार करत आहेत. जर असे झाले तर भारतीय फार्मा उद्योगाला (Indian Pharma Industry) मोठा धक्का बसू शकतो. कारण भारताच्या सुमारे 40% औषधे अमेरिकेला निर्यात होतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump Resignation: डोनाल्ड ट्रम्प राजीनामा देणार? आज रात्री 11:30 होणार मोठी घोषणा, Body Doubleच्या चर्चेने व्हाईट हाऊस हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल