वॉशिंग्टन : अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अणुचाचणीच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मिनिटमॅन III अंतरमहाद्वीपीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Intercontinental Ballistic Missile – ICBM) चाचणी केली आहे. या मिसाइलमध्ये कोणताही वॉरहेड (अणुशस्त्र) नव्हता, परंतु ही क्षेपणास्त्र अणुहल्ला करण्यास सक्षम आहे. चाचणी कॅलिफोर्नियातील वॅन्डेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून करण्यात आली. मिसाइलने सुमारे 4,200 मैल (सुमारे 6,700 किमी) अंतर पार करत क्वाजालीन अॅटोल (मार्शल आयलंड्सजवळ) येथील लक्ष्यावर अचूक प्रहार केला.
advertisement
LGM-30G ‘मिनिटमॅन’ हे नाव का ठेवले गेले?
LGM-30G मिनिटमॅन ही अंतरमहाद्वीपीय बॅलिस्टिक मिसाइल अमेरिकन एअर फोर्स ग्लोबल स्ट्राइक कमांडच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे आणि ती अमेरिकेच्या रणनीतिक अणु प्रतिकारशक्तीचा (Strategic Deterrent Force) महत्त्वाचा भाग आहे.
“L” म्हणजे साइलो लाँच (Silo Launch) — म्हणजे जमिनीखालील प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपण.
“G” म्हणजे ग्राउंड अटॅक (Ground Attack) — म्हणजे जमिनीवरील लक्ष्यांवर प्रहार करणारी.
“M” म्हणजे गाइडेड मिसाइल (Guided Missile).
“30” हे मिनिटमॅन सिरीजच्या क्षेपणास्त्रांसाठी, आणि
“G” हे सध्याच्या मिनिटमॅन III मॉडेलसाठी वापरले जाते.
मिनिटमॅन III ची वैशिष्ट्ये
मिनिटमॅन ही एक रणनीतिक शस्त्र प्रणाली आहे जी अंतरमहाद्वीपीय अंतरावर अचूक हल्ला करू शकणारी बॅलिस्टिक मिसाइल प्रणाली आहे. या मिसाइल्सना शत्रूंच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कठीण सिमेंटच्या साइलोमध्ये (underground silos) ठेवले जाते. या साइलोना भूमिगत लॉन्च कंट्रोल सेंटर्स (LCC) शी मजबूत केबल्सद्वारे जोडलेलं असतं.
प्रत्येक कंट्रोल सेंटर्समध्ये दोन अधिकाऱ्यांची टीम २४ तास सतर्क राहते. ही टीम थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षणमंत्र्यांशी संपर्कात असते, ज्याद्वारे मिसाइल प्रक्षेपणाचे आदेश मिळतात. संपूर्ण प्रणाली अत्यंत जलद प्रतिसाद देणारी आहे आणि अणुहल्ल्याच्या परिस्थितीत काही मिनिटांत कार्यवाही करू शकते.
मिनिटमॅन क्षेपणास्त्राची निर्मिती कधी झाली?
मिनिटमॅन क्षेपणास्त्र प्रणालीची संकल्पना 1950 च्या दशकाच्या अखेरीस मांडण्यात आली आणि मिनिटमॅन-I 1960 च्या दशकाच्या सुरुवातीस अमेरिकन सैन्यात तैनात करण्यात आली. ही प्रणाली अत्यंत क्रांतिकारी आणि तांत्रिकदृष्ट्या ऐतिहासिक प्रगती मानली जाते. ती पूर्वीच्या द्रव इंधनावर चालणाऱ्या, हळू आणि दूरस्थ नियंत्रण असलेल्या ICBM प्रणालींपेक्षा अनेक पटीने प्रगत होती. मिनिटमॅन प्रणालीने घन इंधन (solid-fuel) आणि ऑटोमेटेड गाइडन्स तंत्रज्ञान वापरून अणुयुद्ध प्रतिसादक्षमता वाढवली.
अमेरिकेकडे सध्या 400 मिनिटमॅन III मिसाइल्स
मिनिटमॅन क्षेपणास्त्रांना अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक डिटरेंट प्रोग्रामचा मुख्य आधारस्तंभ मानलं जातं. या मिसाइल्सना सतत हाय-अलर्ट मोडवर ठेवण्यात येतं, म्हणजेच त्या कधीही तत्काळ प्रक्षेपित केल्या जाऊ शकतात. सध्या अमेरिकेच्या ताफ्यात 400 मिनिटमॅन III मिसाइल्स सक्रिय स्थितीत आहेत. त्या तीन प्रमुख एअर फोर्स बेसवर तैनात आहेत.
F.E. Warren AFB (वायोमिंग) – 90th Missile Wing
Malmstrom AFB (मॉन्टाना) – 341st Missile Wing
Minot AFB (नॉर्थ डकोटा) – 91st Missile Wing
हे तिन्ही बेस अमेरिकेच्या न्यूक्लियर ट्रायड अर्थात अणुशक्तीच्या त्रिसूत्रीतील जमिनीवरील घटकाचा मुख्य भाग आहेत.
