व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसते की जोरदार पावसात विमान डावीकडे-उजवीकडे झुलतं आहे. जसं एखादं खेळणं हवेत झुलतंय. एक क्षणासाठी वाटलं की आता ते थेट जमिनीवर आपटणार. पण त्याच क्षणी... पायलटनं कमाल दाखवली.
पायलटने 163 जीव
विमानात 157 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. पायलटनं शेवटच्या क्षणी नियंत्रण मिळवत रनवेवर पुन्हा ताबा मिळवला आणि सुरक्षित लँडिंग केली. इंडोनेशियाच्या Directorate General of Civil Aviation ने पायलटचे कौतुक केलं आणि म्हटलं, त्यांनी क्रॉसविंडच्या आव्हानाला प्रोफेशनल पद्धतीनं हाताळलं.
कोणतीही तांत्रिक हानी नाही
लँडिंगनंतर लगेच तांत्रिक टीमने तपास केला आणि असं आढळलं की विमानाला या घटनेत कोणतीही मोठी हानी झालेली नाही. नंतर हे विमान दुसऱ्या ठिकाणी हलवून सखोल तपासासाठी ठेवण्यात आलं.
दोन आठवड्यांपूर्वी मोठा अपघात
या घटनेनं लोकांना अधिकच घाबरवलं आहे कारण याच्या फक्त दोन आठवड्यांपूर्वी 12 जून रोजी Air India चा Boeing 787-8 Dreamliner क्रॅश झाला होता. ज्यामध्ये 242 पैकी 241 लोकांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी आजूबाजूला असलेल्या 19 लोकांचाही जीव गेला होता. आता पुन्हा एकदा बोइंगच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
