किल वेब तंत्रज्ञानामुळे अमेरिका चिंतेत
अमेरिकन वायुसेनेचे सचिव ट्रॉय मींक आणि अंतराळ संचालन प्रमुख जनरल चान्स सॉल्ट्झमॅन यांनी आगामी वर्षासाठीच्या संरक्षण अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सीनेट उपसमितीच्या सुनावणीस हजेरी लावली. मींक आणि सॉल्ट्झमॅन या दोघांनीही सांगितले की, PLA आपली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता वेगाने विकसित करत आहे. चीनकडे तैवानला लक्ष्य करण्यासाठी 900 हून अधिक अल्प पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची क्षमता आहे. याशिवाय 400 भूआधारित क्षेपणास्त्र असून चीनकडे 1,300 किमीपर्यंत मारक क्षमतेच्या क्षेपणास्त्रांचा साठाही आहे. चीनची 500 किमीच्या क्षमतेची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अलास्का आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकतात, तसेच 400 हून अधिक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे जागतिक स्तरावर अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहेत.
advertisement
‘किल वेब’ तंत्रज्ञान
सॉल्ट्झमॅन यांनी चीनच्या ‘किल वेब’ तंत्रज्ञानाबाबत आपली सर्वात मोठी चिंता व्यक्त केली. हे तंत्रज्ञान PLA ला अमेरिकन सैन्यावर लांबूनच बारकाईने लक्ष ठेवण्यास सक्षम बनवते. त्यांनी सांगितले की, चीनने आतापर्यंत 470 हून अधिक गुप्तचर,देखरेख व टोही उपग्रह तैनात केले आहेत. जे एका आधुनिक ‘सेंसर टू शूटर किल वेब’मध्ये माहिती पुरवतात. हे किल वेब सेंसर थेट स्ट्राइक युनिट्सशी जोडते. डेटा शेअरिंग आणि ऑटोमेशनच्या मदतीने हे तंत्रज्ञान सेकंदांमध्ये हल्ला करु शकते.
अमेरिकन 'किल चेन'ला चीनकडून 'किल वेब'चे उत्तर
चीनचे ‘किल वेब’ तंत्रज्ञान फक्त क्षेपणास्त्र किंवा ड्रोनचा नेटवर्क नसून, युद्धभूमीवर शत्रूला पूर्णपणे घेरून नष्ट करण्याची एक आधुनिक पद्धत आहे. यामागचा हेतू म्हणजे रडार, सेंसर, उपग्रह आणि क्षेपणास्त्र यांना एकत्र जोडून एक अशी जाळं तयार करणं. जे कोणत्याही शत्रूच्या हालचाली क्षणात पकडू शकेल आणि स्वयंचलितपणे प्रतिउत्तर देऊ शकेल. अमेरिका चिंतेत आहे की हे सिस्टम त्यांच्या फायटर जेट्स आणि युद्धनौकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
चीन आता पारंपरिक युद्ध नव्हे तर ‘मल्टी-डोमेन वॉरफेअर’साठी सज्ज होत आहे. ज्यामध्ये आकाश, समुद्र, अंतराळ आणि सायबर यांसारख्या सर्व आघाड्यांवर एकाच वेळी हल्ला करण्याची क्षमता आहे. अमेरिकन वायुसेना आजवर ‘किल चेन’ या रणनीतीवर काम करत होती. ज्यामध्ये शत्रूच्या ओळखपासून ते त्याचा नायनाट होईपर्यंतची प्रक्रिया एक रेषेत चालते. मात्र चीनचे ‘किल वेब’ हे त्या रेषेला एका जाळ्यात बदलते जे एका वेळी अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या टार्गेटवर कोणताही मानवी आदेश न घेता हल्ला करू शकते.