इस्रायल किती शक्तिशाली आहे?
इस्रायलच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर इस्रायलमधल्या संरक्षण दलाचा पाया रचला गेला होता. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सच्या अहवालानुसार, इस्रायलची आर्मी जगातल्या टॉप 20 शक्तिशाली सैन्यांपैकी एक आहे. इस्रायली सैन्यात एक लाख 69 हजार 500 सक्रिय सैनिक आहेत, तर चार लाख 65 हजार सैनिक राखीव तुकड्यांमध्ये आहेत. म्हणजे या देशाच्या सैन्यात एकूण सहा लाख 34 हजार 500 सैनिक आहेत.
advertisement
इस्रायलकडे कोणती शस्त्रं आहेत?
आयर्न डोम : इस्रायलकडे असलेली हवाई संरक्षण यंत्रणा 'आयर्न डोम' हे सर्वांत घातक शस्त्र मानलं जातं. मिसाइल आणि ड्रोनसारखी शस्त्रं इस्रायलच्या भूमीत पोहोचण्यापूर्वीच हा आयर्न डोम हवेत नष्ट करून टाकतो. आयर्न डोम अँटी मिसाइल डिफेन्स सिस्टीममध्ये असे इंटरसेप्टर्स आहेत जे मिसाइल किंवा रॉकेट एखाद्या निवासी भागात पडणार आहे की नाही हे ओळखतात. त्यांना इंटरसेप्ट केल्यानंतर हवेतच नष्ट केलं जातं.
अण्वस्त्रं : Axios च्या अहवालानुसार, इस्रायलकडे किमान डझनभर अण्वस्त्रं आहेत. अनेक संरक्षण तज्ज्ञही या अहवालाशी सहमत आहेत. इस्रायलने मात्र कधीही अधिकृतपणे याला दुजोरा दिलेला नाही.
फायटर जेट : ग्लोबल फायर पॉवरच्या रिपोर्टनुसार, इस्रायली लष्कराकडे किमान 241 लढाऊ विमानं, 48 लढाऊ हेलिकॉप्टर आणि 2200 रणगाडे आहेत.
लॉन्चिंग पॅड : इस्रायलकडे 1200पेक्षा जास्त तोफा आहेत. यात किमान 300 मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीमचाही (एमएलआरएस) समावेश आहे. अनेक युनिट्स स्मार्ट बॉम्बने सुसज्ज आहेत. ते स्मार्ट बॉम्ब लक्ष्यांचा अचूकपणे भेद घेण्यासाठी ओळखले जातात.
युद्धनौका आणि पाणबुड्या : इस्रायली लष्कराकडे किमान सात युद्धनौका आणि किमान सहा पाणबुड्या आहेत. त्यात आएनएस ड्रेकॉनचा समावेश आहे. ही पाणबुडी आण्विक क्षेपणास्त्रं डागण्यास सक्षम आहे.
गुप्तचर संस्था 'मोसाद' : जगातली सर्वांत भयानक मानली जाणारी गुप्तचर संस्था इस्रायलची आहे. तिचं नाव 'मोसाद' आहे. ही संस्था जगभरात आपल्या नेटवर्कसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनंतर जगातली दुसरी सर्वोत्तम एजन्सी म्हणून मोसादकडे पाहिलं जातं.
वाचा - iran-israel war : इराणने इस्रायलच्या दिशेनं डागले 100 हून अधिक ड्रोन
संरक्षण बजेट : संख्यात्मक बळाच्या बाबतीत इराणच्या तुलनेत इस्रायली सैन्य छोटं आहे; पण बजेटच्या बाबतीत ते इराण आणि मध्य पूर्वेतल्या बहुतांश देशांपेक्षा खूप पुढे आहे. इस्रायलचं संरक्षण बजेट 23.6 अब्ज डॉलर्स इतकं आहे. इजिप्त, इराण, लेबनॉन आणि जॉर्डनच्या एकत्रित बजेटपेक्षा फार जास्त आहे.
इराण किती शक्तिशाली आहे?
जगातल्या सर्वांत मोठ्या लष्करांच्या यादीमध्ये इराणचा 14वा क्रमांक लागतो. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक अफेअर्सच्या अहवालानुसार, इराण सध्या मध्य पूर्वेतली सर्वांत मोठी लष्करी शक्ती आहे. त्याच्या सैन्यात पाच लाख 80 हजार सैनिक आहेत, तर सुमारे दोन लाख राखीव दल आहे. एकत्रितपणे ही संख्या सात लाख 80 हजार होते. म्हणजे इराणकडे इस्रायलपेक्षा एक लाख 45 हजार 500 सैनिक जास्त आहेत.
इराणकडे कोणती शस्त्रं आहेत?
बॅलिस्टिक मिसाइल : बॅलिस्टिक मिसाइल्स ही इराणची सर्वांत मोठी ताकद आहे. यूएस डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सच्या कार्यालयाच्या नोंदीनुसार, इराण हा संपूर्ण मध्य पूर्वेतला असा एकमेव देश आहे ज्याच्याकडे सर्वांत जास्त बॅलिस्टिक मिसाइल्स आहेत. 'सेजिल' नावाचं मिसाइल ताशी 17,000 किमी वेगाने 2500 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतं. त्याचप्रमाणे 'खैबर'ची रेंज 2000 किलोमीटर आणि हज कासेमची रेंज 1400 किलोमीटर आहे.
हायपरसॉनिक मिसाइल : इराणकडे केएच-55 सारखी क्रूझ मिसाइल्स आहेत आणि ती आण्विक क्षमतेने सुसज्ज आहेत. ही मिसाइल्स 3000 किलोमीटरपर्यंत अण्वस्त्रं वाहून नेऊ शकतात. गेल्या वर्षी जूनमध्ये इराणने आपलं पहिलं स्वदेशी हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाइल सादर केलं होतं. हायपरसॉनिक मिसाइल आवाजाच्या वेगापेक्षा पाच पट वेगाने प्रवास करतात. त्यामुळे त्यांना इंटरसेप्ट करणं खूप कठीण असतं.
ड्रोन : संपूर्ण मध्य पूर्वेत इराण हा ड्रोनचा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी मोहाजर-10 नावाचं ड्रोन विकसित केलं आहे. हे ड्रोन 2000 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतं आणि 300 किलो वजन वाहून नेऊ शकतं. इस्रायलवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यातही ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता.
अण्वस्त्रं : इराणकडे अण्वस्त्रंदेखील आहेत, असा दावा जगभरातले संरक्षण तज्ज्ञ करतात. कारण, इराणने अण्वस्त्र वाहून नेणारी क्रूझ मिसाइल्स विकसित केली आहेत; मात्र इराणने याचा उघडपणे स्वीकार केलेला नाही किंवा नकारही दिलेला नाही.
फायटर जेट : इराणकडे 273 फायटर जेट आणि अॅटॅक एअरक्राफ्ट आहेत. 50 अॅटॅक हेलिकॉप्टर आणि 240 ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर आहेत. याशिवाय 1783 रणगाडे आणि 500 चिलखती वाहनंदेखील आहेत.