iran-israel war : इराणने इस्रायलच्या दिशेनं डागले 100 हून अधिक ड्रोन; काही तासांत उडणार युद्धाचा भडका!

Last Updated:

इस्रायलमधून मोठी बातमी समोर येत आहे. इराणकडून इस्रायलच्या दिशेनं अनेक ड्रोन डागण्यात आले आहेत.

News18
News18
इस्रायल : इस्रायलमधून मोठी बातमी समोर येत आहे. इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाची थिणगी पडली असून, युद्धाला सुरुवात झाली आहे. इराणने शनिवारी इस्रायलच्या दिशेनं अनेक ड्रोन लॉन्च केले आहेत. मात्र त्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही तास लागणार आहेत. 'टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार इराणने इस्रायलच्या दिशेनं 100 पेक्षा अधिक ड्रोन डागल्याचा दावा इस्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार इराकी हवाई हद्दीमधून अनेक ड्रोन इस्रायलच्या दिशेनं उड्डाण करताना दिसल्याचा दावा इराकमधील सुरक्षा सूत्रांकडून करण्यात आला आहे. एक एप्रिल रोजी दमास्कस येथील इराणच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये दोन वरिष्ठ कमांडरसह सात अधिकारी मारले गेले होते. या हल्ल्यासाठी इराणने इस्रायलला जबााबदार धरले आहे. मात्र इस्रायलकडून या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली किंवा नाकारली नाही.
advertisement
मिळत असलेल्या माहितीनुसार व्हाइट हाऊसने म्हटलं आहे की, अमेरिकेचे राष्ट्रपती जो. बायडन यांनी या हल्ल्याचा विरोध केला आहे. या संदर्भात अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी शुक्रवारीच इराणला इशारा दिला होता. तसेच जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही इस्रायलसोबत असू असं त्यांनी म्हटलं आहे. इस्रायलच्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणने इस्रायलच्या दिशेनं जे ड्रोन डागले आहेत त्यांचं वजन प्रत्येकी 20 किलोग्राम इतकं आहे, तसेच त्याच्यामध्ये स्फोटकांचा मोठा साठा आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
iran-israel war : इराणने इस्रायलच्या दिशेनं डागले 100 हून अधिक ड्रोन; काही तासांत उडणार युद्धाचा भडका!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement