एक निषिद्ध संबंध ज्यामुळे कुटुंब हादरले
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार मूळचे इंग्लंडचे असलेले 62 वर्षीय मार्क गिबन यांचे त्यांच्या 33 वर्षीय सून जॅस्मिन वाईल्डसोबत प्रेमसंबंध सुरू केले. हे दोघेही आपल्या संबंधित जोडीदारांना सोडून एकत्र आले. ते अनेकदा गुप्तपणे भेटत आणि सुट्ट्यांसाठी बाहेर जात. गिबन यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट दिला, तर जॅस्मिनने त्यांचा मुलगा 34 वर्षीय ॲलेक्स गिबनपासून 2012मध्ये वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना दोन मुलेही आहेत.
advertisement
सुरुवातीला त्यांनी हे संबंध नाकारले असले तरी नंतर डेली मेलच्या एका सूत्राने याला दुजोरा दिला की मार्क आणि जॅस्मिन दोन वर्षांपासून एकत्र होते आणि त्यांनी अनेक वेळा कुटुंबासोबत सुट्ट्या घालवल्या होत्या. या संबंधांमुळे कुटुंबात विशेषतः वडील आणि मुलामध्ये मोठा दुरावा निर्माण झाला.
एका मृत्युपत्राने पेटवला वाद
जुलैमध्ये डिस्ने वर्ल्डजवळील सॉल्टेरा रिसॉर्टमध्ये सुट्टीवर असताना परिस्थितीने गंभीर वळण घेतले. पोलिसांनुसार मार्क आणि जॅस्मिन यांच्यात स्विमिंग पूलजवळ जोरदार वाद झाला जो कथितपणे मार्कच्या मृत्युपत्राबाबत होता. जॅस्मिन नाराज होती कारण त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या संबंधांनंतरही तिचे नाव मृत्युपत्रात समाविष्ट केले नव्हते.
हा वाद वाढल्यावर गिबनने जॅस्मिनचे डोके अनेक वेळा पाण्यात दाबून ठेवले, असा आरोप आहे. जॅस्मिनने पोलिसांना सांगितले की तिला आपला जीव जाण्याची भीती वाटत होती, ती श्वास घेण्यासाठी धडपडत होती आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. या भयानक घटनेत तिच्या 9 वर्षांच्या मुलीने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता गिबनने तिला बाजूला ढकलून दिले.
मदतीसाठी हाका आणि थोडक्यात बचाव
जॅस्मिनने जवळच्या दोन महिलांना बोलावून 911 वर फोन करण्यास सांगितले. त्या महिलांनी मध्यस्थी केल्यानंतर गिबनने तिला सोडले. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर खुनाचा प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आला.
पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रात जॅस्मिनच्या विधानाला दुजोरा मिळाला आहे. आणि त्यात असेही नमूद केले आहे की तिला बुडून मरण्याची भीती वाटत होती. गिबनने नंतर तिचे डोके पाण्यात बुडवल्याचे मान्य केले. परंतु तिचा खून करण्याचा कोणताही हेतू नव्हता असा दावा केला. तो म्हणाला की दोघेही दारूच्या नशेत होते आणि भांडणादरम्यान जॅस्मिनने त्याला आधी कानाखाली मारली होती.
विश्वासघात आणि हिंसेने कुटुंब उद्ध्वस्त
या घटनेनंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली. जॅस्मिनचा माजी पती ॲलेक्स जो आधीच आपल्या वडिलांपासून दुरावलेला होता. त्याला गेल्या वर्षी गिबनला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुरुंगात पाठवण्यात आले होते. एका कौटुंबिक सूत्राने सांगितले की- ॲलेक्सला त्याच्या वडिलांनी आणि माजी पत्नीने केलेल्या कृत्याबद्दल कळल्यावर खूप धक्का बसला होता.
मार्क गिबन एक व्यावसायिक लाइटिंग टेक्निशियन आहे. त्याने एड शीरान, सॅम स्मिथ आणि पालोमा फेथ यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. आता तो £८००,००० किमतीच्या मालमत्तेत एकटाच राहतो. त्याच्या या प्रेमसंबंधाच्या कथेने त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे आणि आता कदाचित त्याचे स्वातंत्र्यही धोक्यात आले आहे.
