सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात जावयाचा सासरी कसा पाहुणचार झाला ते दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओत तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांनी एक मोठं टेबल भरलेलं दिसेल. केळ्याच्या पानांवर हे सगळे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. माहितीनुसार एकूण 465 पदार्थ आहेत.
advertisement
पुद्दुचेरीतील येनममधील सत्या भास्कर यांचं हे कुटुंब आहे. त्यांची मुलगी हरिण्या जिचं लग्न आंध्र प्रदेशच्या विजयवाडामधील साकेतशी झालं आहे. गेल्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतरची त्यांची पहिली संक्रांत. त्यानिमित्ताने हरिण्याच्या कुटुंबाने मुलगी आणि जावयाला घरी बोलावलं. त्यांच्यासाठी 465 पक्वानं केली.
सासऱ्यांनी जावयाला फुलांचा हार घालून त्याचं स्वागत केलं. इतकं पक्वान आणि असं स्वागत पाहून जावईही भारावला. सासऱ्यांनी पुष्पहार घालताच जावयाच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. तो ढसाढसा रडू लागला. @jsuryareddy ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.