TRENDING:

500 वर्षांनंतर सापडलं 'भूतिया' जहाज, खोदकाम करताना दिसलं असं काही, पाहून मजुर सुन्न

Last Updated:

हरवलेल्या जहाजांचा आणि त्यातील खजिन्यांचा शोध लागला की तो इतिहासाला नवा वळण देतो. अशाच एका अनोख्या घटनेने आफ्रिकेतील नामिबियात इतिहास घडवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जगभरात समुद्राच्या तळाशी दडलेले अनेक रहस्यं आहेत. लोकांना अशा रहस्यांबद्दल जाणून घ्यायला फार आवडते. कारण ते खूपच रोचक असतात. काही जहाजं प्रवासादरम्यान वादळाला बळी पडतात, तर काही शत्रूंच्या हल्ल्यात नष्ट होतात, तर काही काळाच्या ओघात कुठेच शोधता न लागणाऱ्या ठिकाणी लुप्त होतात. पण कधी अशा जहाजांचे अवशेष खोल समुद्रात सापडतात तेव्हा शास्त्रज्ञ देखील त्याबद्दल आणखी जाणून घेण्यात उत्साही असतात.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

अशाच हरवलेल्या जहाजांचा आणि त्यातील खजिन्यांचा शोध लागला की तो इतिहासाला नवा वळण देतो. अशाच एका अनोख्या घटनेने आफ्रिकेतील नामिबियात इतिहास घडवला आहे.

सन 2008 मध्ये नामिबियातील स्पेरगेबिट (Sperrgebiet) या प्रतिबंधित खनन क्षेत्रात हिरे शोधण्यासाठी खनिक उत्खनन करत होते. तेव्हा त्यांना काही लाकडाचे आणि धातूचे अवशेष आढळले. सुरुवातीला हे कुठलं सामान्य अवशेष आहेत असं वाटलं, पण तपासात समोर आलं की हे साधं काही नसून तब्बल 500 वर्षांपूर्वी हरवलेलं पोर्तुगीज जहाज 'बोम जीसस' (Bom Jesus) आहे. हे जहाज इ.स. 1533 मध्ये गायब झालं होतं.

advertisement

या जहाजातून मिळालेलं दृश्य अवाक करणारं होतं. तब्बल 2,000 सोन्याची नाणी, चांदीची नाणी, तांब्याच्या विटा, हत्तीचे दात, तसेच नेव्हिगेशनसाठीचे उपकरणं यामध्ये सापडले. तज्ज्ञांच्या मते, ही सर्व वस्तू त्या काळातील युरोप–आफ्रिका–भारत व्यापाराचे जिवंत प्रतीक आहेत. या वस्तूंवर त्या काळच्या पोर्तुगालच्या राजा जोआओ तृतीय यांचा शासकीय शिक्का देखील दिसला.

इतिहासकारांचं म्हणणं आहे की या जहाजाला खूप मोठ्या वादळानं नामिबियाच्या धोकादायक किनाऱ्याकडे ढकललं. स्केलेटन कोस्ट नावाने ओळखला जाणारा हा किनारा जहाजांच्या दुर्घटनांसाठी कुख्यात आहे. जहाज खडकांवर आदळलं आणि बुडालं. पण नामिब मरुभूमीच्या कोरड्या हवामानामुळे आणि वाळूत दडून गेल्यामुळे हा खजिना आजतागायत सुरक्षित राहिला.

advertisement

हा शोध महत्वाचा का?

इतिहासासाठी हा शोध अनमोल आहे. कारण यामुळे 16व्या शतकातील जागतिक व्यापार मार्ग, आफ्रिकेचं महत्त्व आणि पोर्तुगालचं वर्चस्व याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळते. समुद्री पुरातत्त्वज्ञ डीटर नोली यांच्या मते, या जहाजात प्रसिद्ध युरोपियन फुगर बँकिंग वंशासाठी माल वाहून नेला जात होता.

जरी हे जहाज पोर्तुगालचं होतं, तरी युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा खजिना नामिबियाची मालमत्ता मानली जाते. पोर्तुगालनेही यात दावा न करता याला औपनिवेशिकतेनंतरचं सहकार्याचं उदाहरण म्हटलं आहे. आता नामिबिया सरकार या मौल्यवान वस्तू एका विशेष संग्रहालयात प्रदर्शित करणार आहे.

advertisement

हा शोध फक्त खजिना सापडल्यामुळे महत्त्वाचा नाही, तर त्यातून मिळणाऱ्या ऐतिहासिक धाग्यांमुळेही तो एक अमूल्य ठेवा मानला जातो. शतकानुशतकं वाळूत दडलेलं जहाज आज लोकांसमोर आलं आहे आणि त्याच्यासोबत इतिहासाचा एक अनोखा अध्यायही उलगडला आहे.

मराठी बातम्या/Viral/
500 वर्षांनंतर सापडलं 'भूतिया' जहाज, खोदकाम करताना दिसलं असं काही, पाहून मजुर सुन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल