TRENDING:

106 प्रवाशांसह ती ट्रेन बोगद्यात शिरली अन् बाहेर आलीच नाही, कशी झालं गायब, काय आहे त्यामागचं रहस्य?

Last Updated:

1911 मध्ये इटलीतील झानेटी ट्रेन 104 प्रवाशांसह बोगद्यात गायब झाली. फक्त दोन प्रवाशांचा बचाव झाला. टाइम ट्रॅव्हल, सुपरनॅचरल शक्ती याबाबत तर्क लावले गेले, पण कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. मेक्सिकोमध्ये दिसल्याचा दावा झाला, पण आजही ही घटना अनुत्तरित आणि रहस्यमय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जगात अनेक गूढ घटना घडत असतात. समुद्रात जहाज गायब होणे किंवा आकाशात विमान बेपत्ता होणे यांसारख्या घटना आपण ऐकतो. पण हाच प्रकार 1911 मध्ये एका ट्रेनसोबत घडला. इटलीतून निघालेली एक नवी ट्रेन 104 प्रवाशांसह गायब झाली. ही घटना इतकी गूढ आहे की, आजही तिचे कोडे उलगडलेले नाही.
News18
News18
advertisement

1911 मध्ये इटलीतील रोम शहरातून एका नव्या ट्रेनची ट्रायल रन घेण्यात आली. ही ट्रेन झानेटी नावाच्या कंपनीने तयार केली होती. प्रवासासाठी मोफत निमंत्रण देण्यात आले होते आणि 106 लोकांनी या ट्रेनमधून प्रवास केला. ट्रेनने गती घेतली आणि ती एका बोगद्यातून जाणार होती. ट्रेन बोगद्यात शिरली, पण बाहेर आलीच नाही!

बोगद्यातून ट्रेन बाहेर न आल्याने शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी दोन प्रवासी बोगद्याच्या बाहेर जखमी अवस्थेत आढळले. त्यांनी सांगितले की, ट्रेन बोगद्याजवळ आली तेव्हा धुराचे लोट दिसू लागले आणि भीतीपोटी त्यांनी उडी मारली. त्यानंतर त्यांच्या डोळ्यांसमोर ट्रेन बोगद्यात शिरली, पण बाहेर आलीच नाही.

advertisement

या घटनेचा तपास 100 वर्षे झाली तरी आजही त्याचा तपास लागलेला नाही. काही जणांचा दावा आहे की, ट्रेन टाइम ट्रॅव्हल करत भूतकाळात गेली. काही रिपोर्ट्सनुसार, ही ट्रेन 1840 मध्ये मेक्सिकोमध्ये दिसल्याचा दावा करण्यात आला. एका डॉक्टरने 104 लोक वेडसर अवस्थेत त्याच्या दवाखान्यात आल्याचे सांगितले.

काही लोकांच्या मते, ही घटना सुपरनॅचरल शक्तींशी संबंधित आहे, तर काहींच्या मते, हे टाइम ट्रॅव्हलचे उदाहरण आहे. मात्र, आजपर्यंत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. बोगदाही नंतर बंद करण्यात आला.

advertisement

आजवर या घटनेवर अनेक तर्क-वितर्क झाले, पण या ट्रेनचे सत्य समजू शकलेले नाही. "घोस्ट ट्रेन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घटनेचे रहस्य अजूनही अबाधित आहे.

हे ही वाचा : Leo Horoscope: सिंह राशीच्या व्यक्तींनी 10 वेळा विचार करून खर्च करावे पैसे, जर प्रेमात असाल तर…

हे ही वाचा : मार्गशीर्ष महिन्यात उपवासाला बनवा साबुदाणा मिल्कशेक, झटपट तयार होते रेसिपी Video

advertisement

मराठी बातम्या/Viral/
106 प्रवाशांसह ती ट्रेन बोगद्यात शिरली अन् बाहेर आलीच नाही, कशी झालं गायब, काय आहे त्यामागचं रहस्य?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल