जमुई : वरातीत वर आणि वधू पक्षात एखाद्या गोष्टी वरुन वाद झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र, वरातीत एका तरुणाचा एका तरुणीवर जीव आला. दोघांची नजरानजर एक झाली आणि दोघांनी आपले मोबाईल नंबरही एक्सचेंज केले. तब्बल 5 वर्षे हे प्रेमप्रकरण चालले. मात्र, 5 वर्षांनी दोघांनी जे पाऊल उचलले त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
advertisement
या प्रेमी युगूलने जवळपास 5 वर्षांच्या प्रेम संबंधानंतर घरातून पळून जाऊन मंदिरात लग्न केले. तसेच या लग्नात एकही वऱ्हाडी सहभागी झाला नव्हता. तसेच कोणताही बँड नव्हता. फक्त वर-वधू आणि पंडितजी हे तीनच जण या लग्नात सहभागी झाले.
CBI च्या नावाने धमकी दिली, डॉक्टरला आला फेक कॉल अन् घडलं धक्कादायक कांड
वरातीत झाले प्रेम, मग घेतला मोठा निर्णय
ही प्रेम कहाणी जमुई जिल्ह्यातील सदर पोलीस ठाणे परिसरातील हरेराम आणि निक्कीची आहे. अमरथ येथील रहिवासी हरे राम कुमार आणि मनिअड्डा येथील रहिवासी निक्की कुमारी जवळपास 5 वर्षांपासून एकमेकांशी प्रेम संबंधात होते. हरे राम आपल्या गावातील एका तरुणाच्या वरातीत सहभागी व्हायला गेला होता. या दरम्यान, त्याची भेट निक्कीसोबत झाली. दोघांनी एकमेकांना पाहिल्यावर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग त्यांनी सोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
निक्की आणि हरेराम
दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांना या प्रेमसंबंधांची माहिती मिळताच त्यांनी या प्रेमसंबंधांना विरोध केला. तसेच दोघांच्या भेटीगाठींवरही बंदी आणली. मात्र, त्यानंतर या प्रेमीयुगुलाने पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि लखीसराय येथील अशोक धाम मंदिरात जाऊन लग्न केले.
Astro : 2 महिने कोणतेही शुभ कार्य नाही, आषाढमध्येही लग्नाचे फक्त 2 मुहूर्त, ज्योतिषी काय म्हणाले?
लग्नानंतर व्हिडिओही शेअर केला -
दरम्यान, लग्न केल्यानंतर या प्रियकर आणि प्रेयसीने एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, त्या दोघांनीही कुणाच्याही दबावाविना स्वत:च्या मर्जीने लग्न केले आहे. प्रेयसीने सांगितले की, 5 वर्षांपासून आमचा संवाद होत होता. जेव्हापासून आम्ही लग्न केले तेव्हापासून आमच्या कुटुंबीयांपासून आम्हाला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारे सासरच्या लोकांनाही धमकावले जात आहे.
तर हरेराम याने साांगितले की, लग्नानंतर पत्नीचे आई-वडील माझ्या कुटुबीयांना धमकावत आहेत. तसेच माझ्या मित्राच्या दुकानात मारहाण तसेच तोडफोडही केली आहे. लग्नानंतर या नवविवाहित दाम्पत्याने पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रेमकहाणीची चांगलीच चर्चा आहे.