आजीचा डान्स व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बॉलिवूड गाण्यावर आजीला थिरकताना पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. या वयातही आजीचा उत्साह एखाद्या तरुणासारखा आहे. आजीचा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय.
बारीक होणं व्यक्तीला पडलं महागात, शरीर पाहून घडलं असं काही....
आजीच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरातील व्हिडीओ असून आजीबाई बॉलिवूड गाण्यावर थिरकत आहे. घरातील बाकीचे सदस्य आजीचा डान्स एन्जॉय करताना पहायला मिळत आहे. करण-अर्जुन चित्रपटातील 'गुप-चुप' गाण्यावर आजी डान्स करताना दिसतेय. आजी डान्स खूप एन्जॉय करत असून तिचा उत्साह आणि आनंद नेक्स लेव्हल आहे.
advertisement
सहसा या वयात वृद्धांना चालायला, फिरायला ताकद नसते. काहीजण तर अंथरुणाला खिळलेले असतात. मात्र ही आजी धमाकेदार डान्स करतेय. dramebaazchhori99 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे.
