बारीक होणं व्यक्तीला पडलं महागात, शरीर पाहून घडलं असं काही....
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजकाल लोक वजनामुळे सतत चिंतेत असतात. बारीक दिसण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करुन फिट राहण्याचा प्रयत्न करतात. आजकाल बारीक होण्याचा जणू ट्रेंडच आहे.
नवी दिल्ली : आजकाल लोक वजनामुळे सतत चिंतेत असतात. बारीक दिसण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करुन फिट राहण्याचा प्रयत्न करतात. आजकाल बारीक होण्याचा जणू ट्रेंडच आहे. त्यामुळे लोक स्वतःला बारीक दाखवण्यासाठी बरीच मेहनत घेतात. मात्र काहीवेळा जास्त बारीक होणं हे धोक्याचं, हानिकारक ठरतं. एका व्यक्तीला जास्त बारीक असणं महागात पडलं त्याच्यासोबत विचित्र प्रकार घडला.
जास्त बारीक असल्यामुळे व्यक्तीचं ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सल झालं. व्यक्ती एवढा बारीक होता की त्याला गाडी चालवायलाच बंदी घातली. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेचा विषय ठरत आहे.
मिरर रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडला. या व्यक्तीचं नाव रोजर्स आहे. त्याला एनोरेक्सिया नावाचा ईटिंग डिसऑर्डर आहे. ज्यामुळे त्याला नेहमी वजन वाढण्याची चिंता अशते आणि खाल्लं जात नाही. जेवण केल्यावरही त्यांना उलटी होते.
advertisement
रोजर्सला खाण्याच्या समस्येमुळे वजनाचीही समस्येचा सामना करावा लागत आहे. त्याचं वजन दिवसेंदिवस कमी होत आहे. शेवटी तो एवढा बारिक झाला की त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करावं लागलं. त्यानंतर त्याला सक्त ताकिद देण्यात आली की, वजन वाढव मगच लायसन्स मिळणार. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2024 12:58 PM IST








