TRENDING:

हृदय थांबतं, श्वास थांबतो… तरीही आठवड्याने जिवंत होतो हा जीव, तुम्हाला माहितीय का त्याचं नाव?

Last Updated:

तुम्हाला माहितीय का की एक असा जीव आहे, जो मेला तरी तो पुन्हा जिवंत होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : निसर्गाचा हा नियम आहे की एकदा का एखाद्या जीवाचा जन्म या पृथ्वीवर झाला तर त्याचं मरण देखील अटळ आहे. प्रत्येकाच्या मृत्यूचा वेळ किंवा कालावधी वेगवेगळा असू शकतो. पण मरण हे अटळ आहे. त्याला कोणीही थांबवू शकत नाही. शिवाय मेलेल्या व्यक्तीला कोणीही पुन्हा जिवंत करु शकत नाही. पण तुम्हाला माहितीय का की एक असा जीव आहे, जो मेला तरी तो पुन्हा जिवंत होतो.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

हा प्राणी आहे बेडूत, ज्याचं आयुष्य म्हणजे जणू मृत्यूला वारंवार हरवण्याची गोष्टच आहे.

हा बेडूक महिनोन्‌महिने मृत्यसारख्या अवस्थेत जातो. त्याचं हृदय धडधडणं थांबतं, श्वासोच्छ्वास बंद होतो, मेंदूची सगळी क्रिया शून्य होते. एखाद्याला वाटेल की तो मेलाच आहे. पण काही दिवसांनी तो पुन्हा जिवंत होतो, हलायला लागतो आणि अगदी पूर्वीसारखा सामान्य जीवन जगू लागतो. हा बेडूक आहे वुड फ्रॉग.

advertisement

वुड फ्रॉग कुठे सापडतो?

वुड फ्रॉग प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील जंगलं आणि दलदलीत आढळतो. आकाराने लहान पण गुणांनी मात्र हुशार असा हा बेडूक थंड प्रदेशात राहतो. हिवाळ्यात जेव्हा तापमान शून्याखाली जातं, तेव्हा हा बेडूक जमिनीवरच्या पानाखाली, मातीखाली लपतो आणि स्वतःला गोठू देतो.

मृत्यासारखी अवस्था का येते?

याला फ्रीझ टॉलरन्स म्हणतात. जसा हिवाळा कडाक्याचा वाढतो, तसतसा वुड फ्रॉगचा लिव्हर मोठ्या प्रमाणात ग्लुकोज तयार करतो. हा ग्लुकोज रक्ताद्वारे साऱ्या पेशींमध्ये पसरतो. काही वेळा तो ग्लिसरॉल नावाचं द्रव्य तयार करतो, जे नैसर्गिक "अँटीफ्रीझ" म्हणून काम करतं.

advertisement

त्यामुळे पेशींमधील पाणी गोठत नाही. शरीराच्या बाहेरील 65-70% पाणी मात्र बर्फात बदलतं. याच अवस्थेत त्याचं हृदय धडधडणं बंद होतं, श्वास थांबतो आणि त्याचा मृत्यू झाल्यासारखा दिसतो.

पुन्हा जिवंत कसा होतो?

हिवाळा संपून वसंत ऋतू आला की बर्फ वितळू लागतं. त्याच वेळी वुड फ्रॉगचं हृदय पुन्हा धडकू लागतं. पेशींमध्ये गोठलेलं पाणी आणि ग्लुकोज परत मिसळलं जातं. काही तासांत श्वास सुरू होतो, स्नायूंमध्ये हालचाल येते आणि तो पुन्हा जिवंत होतो.

advertisement

प्रजननाची पद्धत

वसंत ऋतूत तलावाजवळ नर बेडूक मोठ्याने "टर्र-टर्र" आवाज काढून मादेला आकर्षित करतात. मादी एकावेळी 1 हजार ते 3 हजार अंडी घालते. ही अंडी जेलीसरख्या थरात पाण्यात असतात. नर त्यांचं फलन करतो.

अंडी 1-2 आठवड्यांत फुटतात आणि त्यातून टॅडपोल (polliwog) बाहेर येतात. हे पाण्यात राहून गिल्सद्वारे श्वास घेतात आणि काही महिन्यांत पाय येऊन लहान बेडकामध्ये रूपांतरित होतात.

advertisement

अंगांना नुकसान का होत नाही?

सगळ्यात आश्चर्य म्हणजे इतक्या वेळ मृत्यासारख्या अवस्थेत राहूनही त्याच्या शरीराच्या अवयवांना काही नुकसान होत नाही. स्मरणशक्तीवरही परिणाम होत नाही. म्हणूनच वैज्ञानिक या गुणाचा अभ्यास करत आहेत, जेणेकरून भविष्यात मानवी अवयव जास्त काळ सुरक्षित ठेवता येतील, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या आजारांवर नवी उपचारपद्धती सापडेल.

निसर्गाचा चमत्कार

एक साधा वुड फ्रॉग साधारण 3 ते 5 वर्षे जगतो. पण या आयुष्यातील काही वर्षे तो जणू बर्फाखाली “झोपून” घालवतो. म्हणजेच 5 वर्षांच्या आयुष्यात 2-3 वर्षं तो मृत्यासारख्या अवस्थेत असू शकतो.

निसर्गाने या छोट्याशा बेडकाला दिलेला हा अद्भुत वरदान खरोखरच हैराण करणारा आहे. कारण हा असा एकमेव प्राणी आहे जो वारंवार मरतो आणि पुन्हा जिवंत होतो.

मराठी बातम्या/Viral/
हृदय थांबतं, श्वास थांबतो… तरीही आठवड्याने जिवंत होतो हा जीव, तुम्हाला माहितीय का त्याचं नाव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल