एका डॉक्टरांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात नुकतंच जन्मलेलं बाळ आपल्या छोट्याशा मुठीत Copper T म्हणजेच गर्भनिरोधक डिव्हाइस पकडलेलं दिसतंय. हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला असून त्यावर लोक आश्चर्यचकित प्रतिक्रिया देत आहेत.
नेमकी घटना काय घडली?
‘द मिरर’च्या रिपोर्टनुसार या बाळाचं नाव आहे मॅथ्यूस गॅब्रिएल. त्याचा जन्म ब्राझीलमधील नेरोपोलिस येथील साग्राडो कोराक्सो डी जीसस या रुग्णालयात झाला. विशेष म्हणजे त्याची आई अराउजो डी ओलिवेरा हिने दोन वर्षांपूर्वी गर्भनिरोधक म्हणून Copper T डिव्हाइस बसवून घेतलं होतं. तरीदेखील तिला गर्भधारणा झाली. जे खरोखरच आश्चर्यचकीत करणारं आहे.
advertisement
Copper T म्हणजे काय?
कॉपर टी हे एक छोटं T-आकाराचं डिव्हाइस असतं जे स्त्रीच्या गर्भाशयात बसवलं जातं. हे स्पर्मला अंड्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखतं आणि त्यामुळे प्रेग्नन्सी होण्याची शक्यता जवळपास संपते. हे डिव्हाइस 99% प्रभावी मानलं जातं आणि एकदा बसवलं की 5 ते 10 वर्षं सुरक्षित मानलं जातं.
कॉपर टी असूनही गर्भधारणा
ओलिवेरा हिला प्रेग्नन्सीचं कळलं तेव्हा तिच्या शरीरात कॉपर टी बसवलेलं होतं. मात्र डॉक्टरांनी ते लगेच काढून टाकणं धोकादायक ठरू शकतं असं सांगितलं. असं जर केलं असतं तर तिला गर्भाधारणेच्या काळात अनेक समस्या भेडसावल्या असत्या, त्यामध्ये ब्लीडिंगसारख्या अडचणी आल्या, पण तरीही अखेर बाळाचा सुरक्षित जन्म झाला.
बाळाच्या जन्मानंतर कॉपर टी देखील बाहेर आला. त्यावेळी डॉक्टरांनी तो डिव्हाइस बाळाच्या हातात ठेवला आणि फोटो काढला. बाळाने ते अशा प्रकारे धरलं होतं की जणू काही विजयाची ट्रॉफी हातात घेतली आहे.
हा फोटो आणि व्हिडिओ डॉक्टर नतालिया रोड्रिग्स यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यांनी त्यावर लिहिलं: "आपली विनिंग ट्रॉफी हातात, तो IUD जो मला थांबवू शकला नाही!"
ही अनोखी घटना पाहून सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला चमत्कार म्हटलं तर काहींनी निसर्गाची गंमत मानली.