TRENDING:

तो भारतीय हॉकी खेळाडू, ज्याचा हिटलरही करायचा आदर, त्यांच्या नावावर बांधले गेले स्टेडियम

Last Updated:

या स्टेडियममध्येच क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरने पहिला द्विशतकाचा विक्रम केला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कॅप्टन रूप सिंग हे हॉकीच्या क्षेत्रातील एक महान खेळाडू होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन हॉकीला समर्पित केले होते. ग्वालियरमध्ये त्यांच्या नावाने "कॅप्टन रूप सिंग स्टेडियम" आहे, ज्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. या स्टेडियममध्येच क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरने पहिला द्विशतकाचा विक्रम केला होता. शिवाय, कॅप्टन रूप सिंग यांचे शेवटचे दिवसही ग्वालियरमध्येच गेले, ज्यामुळे हे स्टेडियम आणखी प्रसिद्ध झाले आहे.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

जर्मनीत एका सराव सामन्यात भारत पराभूत झाला होता. मात्र, ओलंपिकमध्ये भारत आणि जर्मनी यांच्यातील महत्त्वपूर्ण हॉकी सामन्यात, कॅप्टन रूप सिंग यांनी पहिला गोल करून सामन्याची सुरुवात केली. त्यानंतर भारताने सलग गोल करत जर्मनीला हरवले. कॅप्टन रूप सिंग यांच्या खेळाने प्रभावित होऊन, जेव्हा हिटलरने जर्मनीचा पराभव जवळून पाहिला, तेव्हा त्याला स्वतःच्या जागेवरून उठून जावे लागले. कॅप्टन रूप सिंग यांच्याविषयी हिटलरही आदर बाळगून होता, असे सांगितले जाते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, फक्त 3 हजारांत सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय, आता सिद्धीची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

जबलपूरचे मूळ रहिवासी असलेले कॅप्टन रूप सिंग यांनी आपला कारकिर्दीचा प्रारंभ ग्वालियरमध्ये केला आणि तेथील हॉकी विश्वात मोठी कामगिरी बजावली. त्यांचे अखेरचे दिवसही ग्वालियरमध्येच गेले. त्यांच्या या महान योगदानाला सन्मान देण्यासाठी, ग्वालियरमधील एका क्रिकेट स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले, जे "कॅप्टन रूप सिंग स्टेडियम" म्हणून ओळखले जाते. येथे अनेक क्रिकेट सामने खेळले गेले आहेत आणि भारताने अनेक विजय मिळवले आहेत. परंतु, हे स्टेडियम आता जुने झाले असून ग्वालियरच्या शंकरपुर भागात नवीन स्टेडियम बांधले गेले आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
तो भारतीय हॉकी खेळाडू, ज्याचा हिटलरही करायचा आदर, त्यांच्या नावावर बांधले गेले स्टेडियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल