मिशेल विली आणि जॉन असं या कपलचं नाव आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये स्कॉटलंडमधील आयरशायर येथील कार्लटन हॉटेलमध्ये त्यांचं लग्न झालं. लग्नाचे फोटो ते पाहत होते आणि आठवणी ताज्या करत होते. तेव्हा फोटोत एक अनोळखी चेहरा दिसला. ही व्यक्ती कोण होती? ती त्यांच्या मित्रमैत्रिणींपैकी कुणी नव्हतं, ना नातेवाईकांपैकी. त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. मिशेल खूप अस्वस्थ झाली.
advertisement
नवरा-बायकोचं रिल पाहून वाहतूक विभागाला घाम, ठोठावला दंड, असं केलं काय?
त्या व्यक्तीचं रहस्य जाणून घेण्यासाठी मिशेलने गुप्तहेरासारखं काम करायला सुरुवात केली. मिशेलने तिच्या मित्रमैत्रिणी, कुटुंब, लग्नस्थळ, फोटाग्राफर आणि सप्लायर सगळ्यांशी संपर्क साधला. त्या दिवशी लग्नाला आलेल्या सगळ्यांशी ती बोलली, पण कोणीही या अनोळखी पाहुण्याला ओळखू शकलं नाही. यानंतर मिशेलने फेसबुकवरही पोस्ट केली, ज्यामध्ये तिने फोटो शेअर केले आणि लोकांकडून मदत मागितली. तरीही, गूढ उलगडलं नाही.
तिच्या लग्नात न बोलावता घुसलेला तो माणूस कोण होता हा प्रश्न चार वर्षे मिशेलला सतावत राहिला. अखेर जवळजवळ चार वर्षांनी याचं उत्तर सापडलं. स्कॉटिश टीव्ही व्यक्तिमत्व आणि युट्यूबर दाझ यांच्या फेसबुक पोस्टने हे गूढ उलगडण्यास मदत केली. तो रहस्यमय पाहुणा स्वतः पुढे आला. त्या माणसाचं नाव अँड्र्यू हिलहाऊस होतं. ज्याचं वय 33 वर्षे तो साउथ आयर्शायरमधील ट्रूनचा रहिवासी होता. तो पेंटर आणि डेकोरेटर आहे.
साधी सर्दी झाली मग कॅन्सर, 13 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पाहून पालक पुरते हादरले
अँड्र्यूने सांगितलं, तो त्या दिवशी त्याच्या पार्टनरची मैत्रिणी मायकेलाच्या लग्नाला जाणार होता. तिच्या लग्नात त्याचा पार्टनर ब्राइड्समॅन होणार होता आणि अँड्र्यूला प्लस-वन म्हणून आमंत्रित केलं होतं. लग्न आयरमधील ग्रेट वेस्टर्न हॉटेलमध्ये होतं पण त्याच्या पार्टनरने चुकून प्रेस्टविकमधील कार्लटन हॉटेलचं ठिकाण दिलं. त्यामुळे अँड्र्यू तिथं पोहोचला. त्याला सर्वकाही सामान्य लग्नासारखं दिसत होतं. समारंभ सुरू झाल्यावर मायकेलाऐवजी दुसरी नवरी चालत आली आणि आपण चुकीच्या लग्नात आल्याचं त्याला समजलं. पण समारंभात उठून निघून जाणं कठीण झालं असतं, कोणाचं लक्ष जाऊ नये म्हणून म्हणून तो तिथेच शांतपणे बसला. 20 मिनिटं विचित्र स्थितीत समारंभ पाहिला आणि नंतर शांतपणे निघून गेला.
ही कहाणी ऐकून मिशेलला हसू फुटलं. मिशेलने असंही म्हटले की त्यांच्या मोठ्या कुटुंबामुळे जॉनलाही त्या अनोळखी व्यक्तीवर संशय आला नाही. त्या दिवशी कोणीही या पाहुण्याबद्दल काहीही विचारलं नाही.