किंग कोब्रा, त्याच्या भव्य आकार आणि प्राणघातक विषासाठी ओळखला जातो, तो एक डेंजर सरपटणारा प्राणी आहे, तर दुसरीकडे, भारतीय कोब्रा, तो जरी लहान असला तरी तो भारतात आढळणारा एक अत्यंत धोकादायक साप आहे. दोन्ही साप कोब्रा कुटुंबातील आहेत, परंतु जेव्हा गोष्ट माणसाच्या जीवाची असते तेव्हा दोघांपैकी सर्वात धोकादायक विष कोणाचं आहे जे माणसाला मारु शकतं असा प्रश्न निर्माण होतो.
advertisement
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, किंग कोब्राच्या तुलनेत भारतीय कोब्रा मानवांसाठी जास्त धोकादायक असू शकतो. किंग कोब्रा, जगातील सर्वात मोठा विषारी साप असूनही, तो कमी आक्रमक म्हणून ओळखला जातो आणि सहसा हल्ला करत नाही. जेव्हा तो चावतो तेव्हा तो मोठ्या प्रमाणात विष सोडतो, परंतु त्याची आक्रमकता तुलनेने कमी असते.
दुसरीकडे, भारतीय कोब्रा, मानवी वस्तीजवळ राहतो आणि तो रागीट स्वभावाचा आहे. त्याचा आकार लहान असला तरी तो कोणत्याही संकटाला त्वरित प्रतिसाद देतो, ज्यामुळे तो माणसासाठी धोकादायक आहे. त्याची ही सवय आणि माणसांशी वारंवार होणारे सामने यामुळे भारतीय कोब्रा हा एक असा साप आहे ज्याच्याशी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
