TRENDING:

बिअर आणि व्हिस्की एकत्र करून पिताय? अल्कोहोल मिक्सिंगचा काय होतो परिणाम!

Last Updated:

एन्जॉय करताना दारू पिण्याचा ट्रेंड अलीकडच्या काळात वाढला आहे. अल्कोहोलचेदेखील अनेक प्रकार आता उपलब्ध आहेत. तसंच दारू सर्व्ह करणारी लहान-मोठी हॉटेल्स सगळ्या मोठ्या शहरांमध्ये दिसतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : एन्जॉय करताना दारू पिण्याचा ट्रेंड अलीकडच्या काळात वाढला आहे. अल्कोहोलचेदेखील अनेक प्रकार आता उपलब्ध आहेत. तसंच दारू सर्व्ह करणारी लहान-मोठी हॉटेल्स सगळ्या मोठ्या शहरांमध्ये दिसतात. मित्रांसोबत पार्टी करताना काही वेगळं करण्याची, काही एक्सपेरिमेंट्स करण्याची लहर येते. अशा वेळी अनेकांना बिअर आणि व्हिस्की हे दोन दारूचे प्रकार एकत्र करून प्यायची इच्छा होते. मात्र तसं करणं खरोखरच योग्य असतं का, हे आधी जाणून घेतलं पाहिजे.
बिअर आणि व्हिस्की एकत्र करून पिताय?
बिअर आणि व्हिस्की एकत्र करून पिताय?
advertisement

मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये अल्कोहोल मिक्सिंगचा एक ट्रेंड रूजलाय. चवीला कदाचित हे पेय चांगलं लागत असेलही, मात्र दोन वेगळ्या प्रकारचं अल्कोहोल एकत्र केल्यानं त्याचा विपरित परिणाम शरीरावर होऊ शकतो. व्हिस्की व बिअर ही दोन ड्रिंक्स एकत्र करण्याचे शरीरावर काय परिणाम होतात जाणून घ्या.

chilled beer: चिल्ड बिअर चवीला का लागते चांगली? यामागे आहे वैज्ञानिक कारण

advertisement

दारू प्यायल्याचे आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात. वेळोवेळी ते सिद्धही झालं आहे. मात्र तरीही दारूचं सेवन केलं जातं. आता तर कॉलेजवयीन मुलांमध्ये पार्ट्यांचा ट्रेंड रूजलाय. त्यातच काही वेगळं करण्याच्या नादात बिअर आणि व्हिस्की एकत्र करून प्यायली जाते. मात्र तसं करणं तुमच्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकतं. व्हिस्कीमध्ये वापरलेले घटक व बिअरमध्ये वापरलेले घटक तसंच त्यांचं प्रमाण भिन्न असतं. दोन्हीची निर्मिती प्रक्रियाही वेगळी असते. अशा वेळी जर या दोन प्रकारच्या दारू एकत्र करून प्यायल्या, तर त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे एकत्र केलेली दारू प्यायल्यानं तुम्ही आजारी पडू शकता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

व्हिस्की व बिअर एकत्र केल्यानं शरीरातलं पाणी कमी होऊन डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. कदाचित एकदा प्यायल्यानं त्रास झाला नाही, तरी हे असं वारंवार केल्यानं पोटावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. यकृत आणि किडनीवर परिणाम होऊन त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. व्हिस्की आणि बिअर या दोन्हीमध्ये अल्कोहोलचं प्रमाण वेगवेगळं असतं. मात्र हो दोन्ही एकत्र केलं तर त्यामुळे जास्त नशा चढते. अशा कॉकटेल पेयामुळे उलट्या होणं, चक्कर येणं, डोकं दुखणं या गोष्टी घडू शकतात. तसंच काहीवेळा गंभीर परिणामही होऊ शकतात. त्यामुळे व्हिस्की व बिअर एकत्र करून पिऊ नये. काही वेळा गंभीर परिणाम झाल्यामुळे जीवावरही बेतू शकतं. त्यामुळे अशा गोष्टी करणं टाळावं.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
बिअर आणि व्हिस्की एकत्र करून पिताय? अल्कोहोल मिक्सिंगचा काय होतो परिणाम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल