chilled beer: चिल्ड बिअर चवीला का लागते चांगली? यामागे आहे वैज्ञानिक कारण
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
सध्या कुठलाही लहान-मोठा प्रसंग असो काही जण अतिशय सहजपणे बिअर पितात. बिअर हे जगातील सर्वात जुनं आणि सर्वाधिक प्रमाणात प्यायलं जाणारं अल्कोहोलिक ड्रिंक आहे. पाणी आणि चहानंतर तिसरे सर्वात लोकप्रिय ड्रिंक म्हणून बिअरकडे पाहिलं जातं.
advertisement
advertisement
advertisement
संशोधनात असं निदर्शनास आलं की, इथेनॉलच्या रेणूंची चव पाण्याच्या तापमानानुसार बदलते आहे. रिसर्चच्या लेखकांपैकी एक असलेले प्रोफेसर ली जियांग ‘द टेलिग्राफ’ला म्हणाले, "आमच्या रिसर्चच्या निष्कर्षांमुळे लोकांना थंडगार बिअर जास्त का आवडते या मताला बळकटी मिळाली आहे. कमी तापमानामुळे बिअरमधील वैशिष्ट्ये वाढतात आणि पिणाऱ्यांना ती अधिक चवदार लागते."
advertisement
रिसर्चर्सच्या असं लक्षात आलं की, इथेनॉलचे रेणू वेगवेगळ्या तापमानात वेगवेगळ्या पेयांमध्ये विशिष्ट आकार धारण करतात. जेव्हा बिअरसारखं कमी-अल्कोहोलयुक्त पेय कमी तापमानात ठेवलं जातं तेव्हा इथेनॉलचे रेणू पिरॅमिडचा आकार धारण करतात.जर जास्त अल्कोहोल असलेल्या पेयांचं तापमान थोडं जास्त असेल तर त्यांच्यातील इथेनॉल रेणू साखळीसारख्या आकारात असतात.
advertisement
advertisement
advertisement






