TRENDING:

आई, भाऊ-बहीण समुद्रात बुडाले, 13 वर्षीय मुलाची उसळत्या लाटांशी झुंज! 4 तास पोहत राहिला, शेवटी...

Last Updated:

13 Old Boy Saved Family From Sea : जोराचा वारा आणि उसळत्या लाटा, काही सेकंदातच संपूर्ण कुटुंब समुद्रात वाहून गेलं, बुडत होतं, आजूबाजूला मदतीसाठी कुणीच दिसत नव्हतं. अशा परिस्थिती 13 वर्षांच्या मुलाने हिंमत केली आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिरोईन समुद्रात बुडाली आणि तिला वाचवण्यासाठी हिरो गेला... असे सीन तुम्हाला फिल्ममध्ये पाहायला मिळतील. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही अवघ्या 13 वर्षांचा मुलगा ज्याचं संपूर्ण कुटुंब समुद्रात बुडालं आणि हा एवढासा मुलगा त्यांना वाचवण्यासाठी 4 तास समुद्रात पोहोत राहिला. जोरदार वारा, उसळत्या लाटांशी त्याने झुंज दिली, मधेच इतर संकटही आली पण त्याने हार मानली नाही. अवघ्या 13 वर्षांच्या मुलाने संपूर्ण कुटुंबाला वाचवलं आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

ऑस्ट्रेलियातील ही घटना. 47 वर्षांची जोआन एपलबी, तिची 13 वर्षांचा मुलगा ऑस्टिन एपलबी, 12 वर्षांचा मुलगा ब्यू एपलबी आणि 8 वर्षांची मुलगी ग्रेस एपलबी. पर्थमध्ये राहणारं हे एपलबी कुटुंब, समुद्रावर फिरायला आलं होतं. ते पॅडल बोर्डिंग आणि कयाकिंग करत होते. सुरुवातीला सगळं ठिक होतं पण नंतर अचानक वातावरण बिघडलं. जोरदार वारा वाहू लागला, समुद्राच्या लाटा उसळू लागल्या. लाटांचा वेग इतका होता की एपलबी कुटुंब समुद्राच्या आत ढकललं गेलं. काही सेकंदातच संपूर्ण कुटुंब किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर वाहून गेलं आणि लाटांमध्ये अडकलं. किनाऱ्यापासून ते बरेच दूर गेले होते. आजूबाजूला मदतीसाठी कुणीच दिसत नव्हतं.

advertisement

अरे बापरे! अवघ्या दीड वर्षांच्या मुलाने 'हल्क'ला गिळलं; रिपोर्ट पाहून डॉक्टरही धक्क्यात

अशा परिस्थिती 13 वर्षांच्या ऑस्टिनने हिंमत केली आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली.  तो कयाकमध्ये बसला आणि मदत मागण्यासाठी थेट समुद्रकिनाऱ्याकडे निघाला. काही अंतरावर गेल्यावर कयाकमध्येही पाणी भरू लागलं, पण ऑस्टिन घाबरला नाही, त्याने हार मानली नाही. त्याने कयाकमधून समुद्रात उडी मारली आणि पोहोत किनाऱ्यावर जायचं ठरवलं. त्याने लाइफ जॅकेट घातलं होतं.

advertisement

संकटं आली पण घाबरला नाही, हरला नाही

काही अंतर पोहोत राहिल्यावर लाइफ जॅकेट आपल्या पोहोण्यात अडथळा आणत आहे, आपला वेग कमी होतो आहे, असं आपण किनाऱ्यावर वेळेत पोहोचणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. म्हणून त्याने तेसुद्धा काढून टाकलं. पुढील दोन तास तो तसाच पोहोत राहिला. जोराचा वारा होता, लाटा उसळत होत्या. त्यात अनेक संकटं आली पण ऑस्टिन जराही डगमगला नाही.

advertisement

मीडियाशी बोलताना ऑस्टिनने सांगितलं, खूप मोठ्या लाटा होत्या, लाइफ जॅकेटही नव्हतं, मी एकच विचार करत  होतो फक्त पोहोत राहा, पोहोत राहा. शेवटी मी किनाऱ्यावर पोहोचलो आणि तिथंच कोसळलो."

तब्बल 4 तास 4 किलोमीटर पोहोल्यानंतर तो किनाऱ्यावर पोहोचला, तो इतका थकला होता की आधी किनाऱ्यावरच त्याने आपलं अंग टाकलं. नंतर उठला आणि तिथून धावत जात बचाव पथकाला माहिती दिली.

advertisement

हे देवा काहीतरी चमत्कार कर! बोलताच मुलासोबत हे काय घडलं? Watch Video

बचावकार्य सुरू झालं. बोट आणि हेलिकॉप्टर मदतीसाठी निघालं. त्याची आई आणि दोन्ही भावंडं किनाऱ्यापासून 14 किलोमीटर अंतरावर सापडले. तिघंही एकाच पॅडलबोर्डला धरून लाटांमध्ये जीवनमृत्यूशी झुंजत होते. रात्री 8.30 च्या सुमारास हेलिकॉप्टरने त्यांचं रेस्क्यू करण्यात आलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

बचाव पथकाच्या म्हणण्यानुसार, आई थकली होती पण तिने आपल्या मुलांना कवटाळून धरलं होतं. पोलीसजेम्स ब्रॅडली म्हणाले की, तिघांनीही लाईफ जॅकेट घातलं होतं, ज्यामुळे ते बुडाले नाहीत. शिवाय 13 वर्षांच्या मुलाची प्रबळ इच्छाशक्ती त्यांना इतक्या जवळून मृत्यूपर्यंत पोहोचण्यापासून वाचवत होती. बचावानंतर कुटुंबाला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं त्यांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडलं. बरे झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब मरीन रेस्क्यू टीमला भेटलं आणि त्यांचे आभार मानले.

मराठी बातम्या/Viral/
आई, भाऊ-बहीण समुद्रात बुडाले, 13 वर्षीय मुलाची उसळत्या लाटांशी झुंज! 4 तास पोहत राहिला, शेवटी...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल