हे देवा काहीतरी चमत्कार कर! बोलताच मुलासोबत हे काय घडलं? Watch Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Child Video Viral : देवाकडे चमत्काराची मागणी करताना या मुलाने व्हिडीओ बनवला, त्यानंतर जे घडलं ते शॉकिंग आहे. मुलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
सोशल मीडियावर लहान मुलांचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ, जो तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात हा मुलगा देवाला काहीतरी चमत्कार करायला सांगतो. त्यानंतर त्या मुलासोबत असं काही घडतं की कुणी विचारही केला नसेल. हा व्हिडीओच चांगलाच चर्चेत आला आहे.
लहान मुलं कधी काय मागतील सांगू शकत नाही. या व्हिडीओतील मुलाने देवासमोर मागणी केली. व्हिडीओत तुम्ही मुलाला पाहू शकता. ज्याने आपल्यासमोर मोबाईल ठेवला आहे. मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आहे. कॅमेऱ्यात पाहत तो देवा काहीतरी चमत्कार कर असं म्हणतो.
advertisement
यानंतर काय होणार आहे, याची कल्पनाही या मुलाने केली नसेल. हे वाक्य म्हटल्यानंतर त्याला मागे काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं. तसं तो मागे वळून पाहतो. जसा तो मागे वळतो, तसं समोरून त्याला त्याची आई येताना दिसते. जी खूप रागात असते. त्याची आई रागात धावत येते, मुलाला धरते, ओढते आणि एक थप्पड लगावते. त्यानंतर मोबाईलचा कॅमेरा बंद करते. झालं संपला व्हिडीओ.
advertisement
देवाला जादू कर म्हणताच देव आईलाचा जादू करण्यासाठी पाठवेल हे मुलाला माहितीही नव्हतं. मुलांनी देवाची प्रार्थना करणं चुकीचं नाही पण मुलगा मोबाईल घेऊन होता याचा राग या आईला आला आणि त्यामुळे तिने तिला मारलं.
advertisement
व्हिडीओ पाहून मुलाची दयाही येते आणि हसूही येतं. मुलाचा आत्मविश्वास, रील्स बनवण्याची आवड आणि आईचा वेळ लोकांना भावतोय. युझर्स म्हणत आहेत की ही खरी जादू होती, देवाने घडवली होती. बरेच जण म्हणतात की ही प्रत्येक घरातील एक कथा आहे, जिथं मुलं गुपचूप रील्स बनवतात आणि अचानक त्यांच्या आईंनी त्यांना पकडलं. व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक बालपणीच्या आठवणींमध्ये हरवले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये मजेदार कमेंट्स पोस्ट करत आहेत.
advertisement
advertisement
manish_sehrawat05 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांनी तो लाईकही केला आहे.
Location :
Delhi
First Published :
Jan 25, 2026 10:10 AM IST








