advertisement

नवऱ्याने 3 कोटींसाठी सोडलं; 5 हजाराची नोकरी करून महिलेने तितक्याच किमतीच घर खरेदी केलं

Last Updated:

Woman Struggle And Success Story : नवऱ्याने सोडलेलं, पदरात मूल आणि भारतातील अवघ्या 5 हजार रुपयांच्या पगाराच्या नोकरीपासून कॅनडात तिने तब्बल 3 कोटींच्या बंगल्यापर्यंत मजल मारली आहे.

News18
News18
फक्त 5000 रुपये पगार आणि त्यातही 3 कोटींचं घर घेतलं... हे वाचूनच कित्येकांना आश्चर्य वाटलं असेल. हे शक्यच नाही, असं जवळपास सगळेच म्हणतील. पण ही अशक्यही शक्य गोष्ट करून दाखवली की एका भारतीय महिलेने. जिच्या नवऱ्याने तिला सोडलं, त्यावेळी तिच्या पदरात मूल होतं, पालनपोषणासाठी तिने नोकरी सुरू केली, पगार फक्त 5 हजार रुपये .पण या 5 हजार रुपयांच्या पगारापासून तो कॅनडात तिने तब्बल 3 कोटींच्या बंगल्यापर्यंत मजल मारली आहे.
हिमी शर्मा असं या महिलेचं नाव. ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना हिमीने आपल्या आयुष्याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. 2005 मध्ये एमबीए करत असताना तिची एका पुरुषाशी भेट झाली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जातीभेदांमुळे कुटुंबाचा विरोध होता. तरी कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केलं.
हिमीने सांगितलं,  लग्नानंतरची पहिली 3 वर्षे चांगली गेली, पण नोव्हेंबर 2010 मध्ये त्यांचें आयुष्य पूर्णपणे बदललं. तिच्या सासूने तिच्या नवऱ्याला बायको आणि 3 कोटींच्या प्रॉपर्टीपैकी एकाची निवड करायला सांगितली. तिच्या नवऱ्याने बायको आणि मुलाऐवजी प्रॉपर्टी निवडली.
advertisement
हिमीला नवऱ्याने सोडलं, तिच्या पदरात अवघ्या 2 वर्षांचं मूल.  त्यावेळी हिमी शिक्षिका होती आणि महिन्याला फक्त 5000 रुपये कमवत होती. हिमी तिच्या मुलासोबत पीजीमध्ये राहू लागली, जिथं फक्त भाडंच तिच्या पगाराच्या दुप्पट होतं. त्या इतर खर्च आणि मुलाचं पालनपोषण. तिच्यावर कर्ज वाढत गेलं, जगायचं कसं अशा परिस्थितीत ती आली होती.  सुदैवाने तिला 30000 रुपयांची नोकरी मिळाली आणि ती तिच्या पालकांच्या घरी राहू लागली, पण तिथंही तिच्याकडून भाडं म्हणून 10000 रुपये घेतले जात होते.
advertisement
सर्वात वेदनादायक क्षण तेव्हा आला जेव्हा शाळेची फी भरलेली नसल्याने तिच्या मुलाला शाळेत बसू दिलं नाही. 'आई मी शाळेत जाईन ना?', असं तिच्या मुलाने तिला विचारलं. मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी तिने तिचे दागिने गहाण ठेवले. यानंतर तिने दिवसरात्र मेहनत केली.
advertisement
जवळजवळ 10 वर्षांपूर्वी हिमीने तिचं आयुष्य पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला. तिने खर्च करून काही पैशांची बचतही केली. 2 लाख रुपयांपेक्षा कमी बचत असताना तिने कॅनेडियन व्हिसासाठी अर्ज केला. 2019 मध्ये ती कॅनडामध्ये आली आणि अवघ्या एका महिन्यातच तिला कॉलेज प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली. कोणत्याही आधाराशिवाय तिने हळूहळू तिचे आयुष्य पुन्हा उभारलं.
advertisement
ज्या 3 कोटींसाठी तिच्या नवऱ्याने सोडलं तितक्याच किमतीचं घर आज तिने कॅनडात स्वतःच्या बळावर घेतलं आहे. 3 कोटी रुपयांच्या घराची lr मालक आहे.
हिमी म्हणते, "मला सगळे म्हणायचे की माझा मुलगा मोठा झाल्यावर माझी काळजी घेईल. पण मी वाट पाहिली नाही. मी स्वतः आम्हाला वाचवलं."  आज तिचा मुलगा अशा वातावरणात वाढत आहे जिथे कोणत्याही प्रकारची छळवणूक होत नाही.
advertisement
advertisement
हिमी शर्माची कहाणी फक्त एका महिलेची नाही तर त्या प्रत्येक व्यक्तीची आहे जिला ओझं मानलं गेलं आहे. ही कहाणी दाखवते की जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर काहीच अशक्य नाही.
view comments
मराठी बातम्या/देश/
नवऱ्याने 3 कोटींसाठी सोडलं; 5 हजाराची नोकरी करून महिलेने तितक्याच किमतीच घर खरेदी केलं
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement