Sachin Kumawat : कधी बिगारी, कधी विट भट्टीवर काम; खानदेशचा किंग सचिन कुमावतची इनसाइड स्टोरी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sachin Kumawat Life Insite Story : खानदेशचा किंग सचिन कुमावत यांचा बिग बॉस मराठी 6 मधील प्रवास सगळेच पाहत आहेत. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रवास आजवर फार कोणाला माहिती नाही.
advertisement
advertisement
सचिन कुमावत यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या शेंदुर्णी गावात झाला. सचिन कुमावत मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आले. त्यांचे वडील सुरुवातीला मजुरी करायचे. नंतर हळूहळू बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर झाले. मात्र अनेक वर्षे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. सचिन यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण शेंदुर्णी गावातच झालं. पुढे जळगावला जाऊन त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं.
advertisement
इंजिनिअरिंग करतानाच सचिन यांना संगीताची गोडी लागली. मालेगावचे अशोक जाधव यांचा 'दे हाती' लोकगीत कॅसेट अल्बम ऐकून ते भारावून गेले. याच प्रेरणेतून त्याने वडिलांकडे कॅसिओ शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जळगावच्या गोदावरी संगीत महाविद्यालयात हार्मोनियमचे क्लासेस लावले आणि संगीतभूषण ही पदवी मिळवली.
advertisement
advertisement
सचिनच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सहावीत असताना आला होता. घरची परिस्थिती इतकी वाईट होती की अंगावरच्या बनियनवर भोकं पडली होती. त्या काळात त्यांची आई मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी काम करायची. मिळालेल्या शंभर सव्वाशे रुपयांत तिने घरच्यांसाठी बाजार केला आणि सचिनसाठी बनियन, अंडरवेअर आणली. हा प्रसंग आठवून सचिन आजही भावुक होतात.
advertisement
advertisement








