T20 World Cup 2026 : बांग्लादेश बाहेर होताच पाकिस्तानचा ड्रामा सुरू! 'ट्रॉफी चोर' मोहसिन नक्वीचे नवे नखरे! म्हणाले 'जर आमच्या पंतप्रधानांनी...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mohsin Naqvi T20 World Cup statement : आयसीसी एका देशासाठी सोयीचे निर्णय घेते आणि दुसऱ्या देशासाठी मात्र पूर्णपणे वेगळी भूमिका घेते. हे 'डबल स्टँडर्ड्स' आता थांबायला हवेत, असं ट्रॉफी चोर मोहसिन नक्वी म्हणाले.
Pakistan in T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा पेच निर्माण झाला असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आयसीसीवर (ICC) कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढण्याच्या निर्णयाचा त्यांनी तीव्र निषेध केला असून आयसीसी दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशवर झालेला हा अन्याय असून त्यांना कोणत्याही परिस्थितीत वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळायला हवी, अशी भूमिका नक्वी यांनी मांडली आहे. त्यामुळे ट्रॉफी चोर नक्वी यांची चर्चा होताना दिसतीये.
एका देशासाठी सोयीचे निर्णय
बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात मॅच खेळण्यास नकार दिला होता, ज्यानंतर आयसीसीने त्यांना स्पर्धेतून हटवून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला आहे. या निर्णयावर बोलताना नक्वी म्हणाले की, आयसीसी एका देशासाठी सोयीचे निर्णय घेते आणि दुसऱ्या देशासाठी मात्र पूर्णपणे वेगळी भूमिका घेते. हे 'डबल स्टँडर्ड्स' आता थांबायला हवेत, कारण बांगलादेश हा क्रिकेट विश्वातील एक मोठा स्टेकहोल्डर आहे.
advertisement
अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेईल
पाकिस्तानच्या सहभागाबाबत बोलताना मोहसीन नक्वी यांनी स्पष्ट केले की, या विषयावर अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेईल. पंतप्रधान सध्या देशाबाहेर असून ते परतल्यावर त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील पाऊल उचलले जाईल. जर सरकारने वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा आदेश दिला, तर पाकिस्तानही या स्पर्धेतून माघार घेईल. अशा परिस्थितीत आयसीसीला 22 व्या टीमचा शोध घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
advertisement
सरकारच्या निर्णयांना जास्त बांधील
नक्वी यांनी आयसीसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, आम्ही आयसीसीपेक्षा आमच्या सरकारच्या निर्णयांना जास्त बांधील आहोत. बांगलादेशला हायब्रीड मॉडेल (hybrid model) नाकारणे हे चुकीचे आहे, कारण पाकिस्तानला अशाच प्रकारची सवलत देण्यात आली आहे. एका देशाने दुसऱ्यावर आपली मर्जी लादणे हे क्रिकेटच्या हिताचे नाही, असे मत त्यांनी लाहोरमधील प्रेस कॉन्फरन्समध्ये व्यक्त केले.
advertisement
What a laughable excuse by Mohsin Naqvi for delaying the WC 2026 boycott He says they’re waiting for the PM to return from the US. In the internet age, Zoom exists. If there was real intent, the boycott would be announced already pic.twitter.com/WaFxzCI7jF
— Wahida (@RealWahidaAFG) January 24, 2026
advertisement
टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर टांगती तलवार
सध्या सुरू असलेल्या या वादामुळे फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. बांगलादेशनंतर आता पाकिस्ताननेही माघार घेण्याचे संकेत दिल्यास ही स्पर्धा मोठ्या संकटात सापडू शकते. आता सर्वांचे लक्ष पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निर्णयाकडे लागले आहे, कारण त्यांच्या एका निर्णयावर या स्पर्धेचे भवितव्य अवलंबून आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 7:17 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026 : बांग्लादेश बाहेर होताच पाकिस्तानचा ड्रामा सुरू! 'ट्रॉफी चोर' मोहसिन नक्वीचे नवे नखरे! म्हणाले 'जर आमच्या पंतप्रधानांनी...'








