शाळेत तुम्ही लिहिलेलं लव्ह लेटर. कदाचित त्यात तुम्ही जे लिहिलं होतं ते आठवून तुम्हाला आता हसू येत असेल. असंच काहीसं या मुलीचंही लेटर आहे. ज्यात तिने असं काही लिहिलं आहे, ही तुम्हाला हसू आवरणार नाही. हे लेटर वाचल्यानंतर लोक बेशुद्धच होतील असंच म्हणावं लागेल. कारण पत्र आहेच तसंच. आता या प्रेमपत्रात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याची तुमचीही उत्सुकता वाढली असेल.
advertisement
जिवंतपणी हातही लावू दिला नाही, नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोने त्याचा मोबाईल घेतला अन् घडलं असं की...
पत्राच्या सुरुवातीला सगळ्यात वर आय लव्ह यू अमन असं इंग्रजीत लिहिलं आहे. पुढे माय जान असं म्हटलं आहे. पुढे पत्रात कविता लिहिली आहे, म्हटलं आहे. "आलू पराठा, एक ग्लास पाणी, अमन, तुझ्या आठवणीत मला भूक किंवा तहान लागत नाही", मुलीने त्या मुलाचा फोन नंबरही मागितला आहे. तसंच शेवटी खाली उजव्या कोपऱ्यात हार्ट काढून त्यात अमन आणि दामिनी असं नाव लिहिलं आहे. पत्रावर फुलं वगैरे काढून ते सुंदर सजवलेलंही दिसतं आहे.
वर्गातील विद्यार्थ्यांना मुलीचं हे पत्र मिळालं आणि त्यांनी ते शिक्षकांना दाखवलं. व्हिडीओतील संभाषणानुसार ज्या मुलीने हे पत्र मुलगी सहावीच्या वर्गातील आहे.
बाबो! बायकोला सोडण्यासाठी 42% पुरुषांनी घेतलं कर्ज, नेमकं प्रकरण काय?
@v_kumarup78 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींना आपलं शाळेतील प्रेम आठवलं आहे. एका युझरने लिहिलं, "हे आमच्या पिढीतील प्रेम होतं. आजकाल ते इन्स्टाग्रामवर लाईक्सने सुरू होतं" दुसऱ्याने म्हटलं, "अमन भाग्यवान आहे. आलू पराठाबद्दलची ओळ हिट आहे!" या व्हिडीओवरील तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.