काय आहे नेमके प्रकरण -
भागलपुरमधील चुटिया बिलारी ग्रामपंचायतीने एक मोठा निर्णय घेतला आहे. येथील तरुण-तरुणींना आता एकमेकांच्या प्रेमात पडणे भारी पडणार आहे. बांकाच्या शंभुगंज पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात प्रेमी जोडप्यांना पकडण्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच यावर 1 लाख रुपयांचा दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. चुटिया बिलारी गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्याद्वारे गावासाठी एक कायदा तयार करण्यात आला आहे, यामध्ये जर कोणतेही प्रेमी जोडपे पकडण्यात आले, तर त्याच्या नातेवाईकांना 1 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. तसेच त्याला समाजाप्रमाणे शिक्षाही होणार आहे. चुटिया बिलारी गावातील उपसरपंच वजीह हुसैन यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, याठिकाणी आम्ही दोन समुदायाचे नागरिक राहतात. यामध्ये मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायाचे लोक बेलारी गावात राहतात आणि अनेक वर्षांपासून प्रेम आणि सद्भावनेने राहत आहोत. मात्र, येथील नवीन तरुण-तरुणींमधील वातावरण खराब होत आहे. नुकतेच येथील दोन समुदायातील तरुण-तरुणींनी पळून जाऊन लग्न केले. यानंतर गावात तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. दोन्ही समुदायांमध्ये मारहाणीची शक्याताही निर्माण झाली होती. रस्ता जाम करण्यात आला होता. तसेच गावातील लोकांवर गुन्हेही दाखल झाले.
यामुळे गावातील वातावरण खराब होत होते. त्यामुळे दोन्ही समुदायातील लोकांशी संवाद करुन हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये केवळ एकाच समाजातील लोकांना अशी चूक केल्यास दंड भरावा लागणार नाही, तर एकाच समाजातील तरुण-तरुणी पकडले गेल्यास दोघांच्या कुटुंबीयांनाही दंड भरावा लागणार आहे. येथील वातावरण बिघडू नये आणि परस्पर बंधुभाव तुटू नये, असे आम्हाला वाटते. त्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शंभूगंज पोलीस ठाण्यालाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासमोरच टीमचे नियुक्ती केली जात आहे. हे पथक प्रेमी जोडप्यांवर लक्ष ठेवतील. या अशा घटनांमुळे गावाची बदनामी होत आहे. समाजाची बदनामी होईल, असे कोणतेही काम करू नये, याबाबत गावातही सर्वांना माहिती देण्यात आली आहे. इस्लाहुल मोमनीन असे या पथकाचे नाव आहे. दरम्यान, आता या निर्णयानंतर नेमके काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.