1 हजारहून अधिक मूक-बधिर मुलांना केले शिक्षित, पंतप्रधान मोदी अन् आमिर खान यांनीही केले कौतुक, कोण आहे ही महिला?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
teacher deepmala pandey - दीपमाला पांडे असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्या बरेली शहरातील आहेत. दीपमाला पांडे या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 2017 पासून त्या ‘वन टीचर वन कॉल’ ही मोहिम राबवित आहेत.
विकल्प कुदेशिया, प्रतिनिधी
बरेली : शिक्षणावर सर्वांचा अधिकार असावा, याच विचारधारेतून एका शिक्षिकेने अत्यंत कौतुकास्पद असे कार्य केले आहे. या शिक्षिकेच्या कार्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांनीही कौतुक केले आहे. ही शिक्षका कोण आहे, याच शिक्षिकेच्या कार्याबाबत आपण जाणून घेऊयात.
दीपमाला पांडे असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्या बरेली शहरातील आहेत. दीपमाला पांडे या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 2017 पासून त्या ‘वन टीचर वन कॉल’ ही मोहिम राबवित आहेत. यामध्ये त्या जे शाळेत जात नाही किंवा जी मुले दिव्यांग आहेत, अशा मुलांना शिकवतात. या सर्वांना शिक्षण मिळावे, यासाठी त्या ही मोहिम राबवत आहेत. दीपमाला पांडे यांनी आतापर्यंत 1 हजारपेक्षा अधिक मुकबधिर विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषा (sign language) शिकवली आहे.
advertisement
शिक्षिकेचा पुरस्कारांनी सन्मान -
त्यांना अभिनेते आमिर खान यांनीही सन्मानित केले आहे. तसेच दिल्लीत आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमातील आवाहनावर आंदोलनाला केंद्र बिंदू मानत एक पॅनल डिस्कशन करण्यात आले. यामध्ये आमिर खान यांच्यासोबतचे पॅनेलिस्ट बनले. एखाद्या नवीन गोष्टीला सुरुवात करुन तिला राष्ट्रीय स्तरावर कसे घेऊन जाता येईल, यावर चर्चा सुरू झाली. याशिवाय या मोहिमचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमातही केला होता आणि त्यांनी दीपमाला यांचे कौतुक केले होते.
advertisement
दिव्यांग मुलांसाठी मोहिम -
दीपमाला पांडे यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, जी मुले दिव्यांग आहेत किंवा शाळेत येऊ शकत नाही, अशा मुलांसाठी ते या मोहिम राबवतात. यामध्ये त्यांनी शिक्षकांचा एक ग्रुपही तयार केला आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांना अभ्यासासाठी प्रेरित केले आहे. त्यांच्या या कार्यात त्यांच्यासोबत तब्बल 800 शिक्षक आणि 1000 विद्यार्थी जोडले गेले आहेत.
advertisement
यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये सांकेतिक भाषेसंबंधित कार्यशाळाही आयोजित केल्या जातात, अशी माहिती त्यांनी दिली. जर दिव्यांग मुलांनाही सामान्य मुलांप्रमाणे वागणूक दिली तर अशा मोहिमांची काहीच गरज पडणार नाही, असेही त्या सांगतात.
Location :
Uttar Pradesh
First Published :
October 07, 2024 6:27 PM IST
मराठी बातम्या/देश/
1 हजारहून अधिक मूक-बधिर मुलांना केले शिक्षित, पंतप्रधान मोदी अन् आमिर खान यांनीही केले कौतुक, कोण आहे ही महिला?