TRENDING:

लग्न झाल्यापासून सतत तेच! बायकोची नको ती सवय, 25 दिवसांतच नवऱ्याचा गेला जीव

Last Updated:

Groom Died After 25 Days of Marriage : लग्न झाल्यापासून त्याच्या बायकोची अशी सवय ज्याला तो वैतागला होता. बायकोच्या याच कृत्यामुळे लग्नानंतर 25 दिवसांतच नवरदेवाचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : लग्न झाल्यानंतर प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतात. असाच एक तरुण ज्याचं लग्न झालं आणि संसाराबाबत स्वप्न रंगवत होता. पण लग्न झाल्यापासून त्याच्या बायकोची अशी सवय ज्याला तो वैतागला होता. बायकोच्या याच कृत्यामुळे लग्नानंतर 25 दिवसांतच नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना.
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
advertisement

रंगैयाखेडा गावात राहणारा सुधीर वर्मा, एक शेतकरी. 25 दिवसांपूर्वीच त्याने बिहारमधील आशा नावाच्या तरुणीशी लग्न केलं आणि तिला गावात आणलं होतं. पण कुटुंबाच्या म्हणण्यानुसार सुधीर आणि आशा यांच्यात सतत वाद होत असत. या वादामुळे आशा दोन वेळा कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडून निघून गेली. दोन्ही वेळा सुधीरने तिला परत बोलावलं. कशीबशी तिची समजूत काढून तिला घरी आणलं.

advertisement

दादागिरी करतोय! शेजाऱ्याविरोधात तक्रार; कथित आरोपीला पाहून अधिकाऱ्यांनीही डोक्याला लावला हात

पण रविवारी आशाने पुन्हा तेच केलं. कुणालाही न सांगता ती घराबाहेर पडली. यावेळीही सुधीर तिला आणायला गेली. त्याने रात्रभर तिचा शोध घेतला, पण ती कुठेही सापडली नाही. पत्नी तिसऱ्यांदा सोडून गेली आणि ती आता सापडत नाही, यामुले सुधीर व्यथित आणि निराश झाला. त्याच रात्री त्याने भयानक पाऊल उचललं. त्याने पत्नीच्या साडीचा फास वापरून गावाबाहेरील झाडाला गळफास घेऊन आपलं आयुष्य कायमचं संपवलं.

advertisement

सोमवारी सकाळी गावकरी तिथून जात असताना त्यांना सुधीरचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. माहिती मिळताच कछौना पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मीडिया रिपोर्टनुसार पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

नवरा करायचा 'ते' कृत्य, रात्रभर बायकोला झोप नाही; लग्नाच्या महिनाभराने तिचा मृत्यू

advertisement

अशीच घटना 2024 साली राजस्थानमध्येही घडली होती. नवराच्या नको त्या कृत्यामुळे लग्नाच्या महिनाभरातच बायकोचा मृत्यू झाला होता.

अलवरच्या तिजारा परिसरात राहणारी सोनम. नर्सिंगचे शिक्षण घेत असताना मनोजशी तिची ओळख झाली. मनोज बिहारमध्ये कंपाउंडर म्हणून काम करत होता. दोघांचं लग्न झालं. लग्नानंतरचे सहा दिवस अगदी चांगले गेले. सर्वकाही सुरळीत सुरू होतं.

advertisement

हनीमूनसाठी आसुसलेला नवरदेव! सकाळी कोर्टात लग्न, पहिल्याच रात्री मृत्यू, नेमकं काय घडलं?

पण सहा दिवसांनी मनोज रात्रभर गायब होऊ लागला. सोनम रात्रभर त्याची वाट पाहत जागी असायची. पण तो दुसऱ्या दिवशी घरी यायचा. आपल्या नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत, रात्री तो तिच्याकडे जातो असा संशय सोनमला आला. तिनं त्याला याबाबत विचारलं, तर त्याने तिला मारहाण केली. तो तिला आपल्या फोनलाही हात लावू द्यायचा नाही. एकदा तिनं त्याच्या फोनला हात लावला, तेव्हाही त्यानं तिला मारहाण केली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

सोनमनं नवऱ्याबाबत घरच्यांकडेही तक्रार केली होती. सोनमच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो तिच्यापासून अनेक गोष्टी लपवायचा मनोजने तिचा छळ सुरू केला होता. सोनमने पतीचा अत्याचार सहन न झाल्याने रेल्वेसमोर उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.

मराठी बातम्या/Viral/
लग्न झाल्यापासून सतत तेच! बायकोची नको ती सवय, 25 दिवसांतच नवऱ्याचा गेला जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल