दादागिरी करतोय! शेजाऱ्याविरोधात तक्रार; कथित आरोपीला पाहून अधिकाऱ्यांनीही डोक्याला लावला हात

Last Updated:

शेजाऱ्यांमधील वादाचं प्रकरण चर्चेत आलं आहे. शेजाऱ्याने त्याच्या शेजाऱ्याविरोधात तक्रार केली. पण ज्याला आरोपी बनवण्यात आलं त्याला प्रत्यक्षात पाहून तर अधिकारीही थक्क झाले.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
लखनऊ : शेजारी म्हटलं की भांडणं आलीच. शेजाऱ्या शेजाऱ्यांमधील भांडणं काही नवीन नाहीच. काही वेळा शेजाऱ्यांची भांडणं अगदी पोलिसांपर्यंतही जातात. असाच शेजाऱ्यांमधील वादाचं प्रकरण चर्चेत आलं आहे. शेजाऱ्याने त्याच्या शेजाऱ्याविरोधात तक्रार केली. पण ज्याला आरोपी बनवण्यात आलं त्याला प्रत्यक्षात पाहून तर अधिकारीही थक्क झाले.
उत्तर प्रदेशच्या कौशंबीमधील ही घटना आहे. एका पुरूषावर दादागिरी, गुंडगिरी केल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप शेजाऱ्यांनी केला होता. जगपत सिंग असं आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव. चैल तहसील कार्यालयात त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली.  जगपत सिंग यांनी त्यांच्या बांधकाम कामात अडथळा आणल्याचा आणि वर्चस्व दाखवल्याचा आरोप केला होता.
advertisement
त्यानंतर तहसील कार्यालयात या प्रकरणी सुनावणी होणार होती, या प्रकरणाचा निकाल लागणार होता. मंगळवारी कौशांबी येथील चैल तहसीलमध्ये वकिलांच्या दालनात गर्दी होती.  तक्रारदार आणि आरोपीलाही बोलावण्यात आलं.
जेव्हा जगपत यांच्या कुटुंबाला याबाबत समजलं तेव्हा त्यांचं कुटुंब त्यांच्यासह तहसील कार्यालयात पोहोचलं. पत्नी शकुंतला देवी, मुलगा करण आणि सौरभ, मुलगी निशी यांच्यासह जगपत यांना घेऊन तहसीलमध्ये गेले.
advertisement
पण जगपतला पाहून दंडाधिकारी आणि वकील थक्क झाले. जगपत सिंह हा 95 वर्षांचा. त्याची अवस्था अशी होती ही तो साधा पाण्याचा ग्लास हातात घेऊन पाणीही पिऊ शकत नव्हता. त्याला तहसील कार्यालयातही खाटेवरून नेलं. त्यामुळे अशी व्यक्ती कुणावर दादागिरी, गुंडगिरी कशी काय करेल असा प्रश्न अधिकाऱ्यांनाही पडला.
advertisement
करण सिंग म्हणाला की, त्याच्या वडिलांवर कलम 151 अंतर्गत कधीही आरोप लावण्यात आलेले नाहीत. पण गावातील शुभम सिंग, भगत सिंग आणि मोतीलाल यांनी त्याच्यावर खोटे आरोप केले आहेत, त्याला दादागिरी करणारा म्हटलं आहे आणि त्याच्यावर गुंडगिरीचा आरोप केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी कुटुंबाने स्वतः त्याला त्याच्या खाटेसह दंडाधिकाऱ्यांसमोर आणलं जेणेकरून अधिकाऱ्यांना सत्य कळेल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
दादागिरी करतोय! शेजाऱ्याविरोधात तक्रार; कथित आरोपीला पाहून अधिकाऱ्यांनीही डोक्याला लावला हात
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement