OYO Hotel ची रूम, नेहमी बंद असायचा दरवाजा; पोलिसांनी तोडला आणि दृश्य पाहून नुसती पळापळ

Last Updated:

OYO Hotel News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी बराच वेळ दरवाजा उघडण्याची वाट पाहिली, पण जेव्हा तो उघडला नाही तेव्हा त्यांनी दरवाजा तोडला.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
लखनऊ : ओयो हॉटेल म्हणजे सगळ्यांना परवडणारं असं. किती तरी लोक या हॉटेलमध्ये राहतात. असंच एक ओयो हॉटेल सध्या चर्चेत आलं आहे. या हॉटेलची एक बंद खोली, जी नेहमी बंद असायची. एक दिवस पोलीस तिथं आले त्यांनी या रूमचा दरवाजा उघडला आणि आतील दृश्य पाहून पोलिसांचीही पळापळ सुरू झाली. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील हे प्रकरण आहे.
वाराणसीच्या कॅन्टोन्मेंट भागातील एका हॉटेलवर बुधवारी (29 ऑक्टोबर) पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी बराच वेळ दरवाजा उघडण्याची वाट पाहिली, पण जेव्हा तो उघडला नाही तेव्हा त्यांनी दरवाजा तोडला. आत कोणीही आढळलं नाही. त्यांनी आत तपास केला तेव्हा खोलीची खिडकी उघडी होती.
advertisement
त्यानंतर जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. ज्यामध्ये असं दिसून आलं की दोन परदेशी महिला शेजारच्या वकिलाच्या घराच्या छतावर उडी मारून पळून जात आहेत. पळून गेलेल्या दोन्ही परदेशी महिला रशियन आहेत, असा अंदाज लावला जात आहे. वृत्तानुसार हॉटेल रूममध्ये 6 महिला होत्या. 4 भारतीय आणि 2 परदेशी. 2 परदेशी महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या आणि 4 जणांना पोलिसांनी अटक केली.
advertisement
इथं वेश्याव्यवसाय चालत होता.  पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. जिथं भारतातील काही राज्यातील आणि परदेशी महिलाही होत्या.
हॉटेलचं नाव टाउन हाऊस आहे. हॉटेल मालक सुमित शरीननं सांगितलं की त्याने दसमीत सिंग याच्याशी करार केला होता. दसमीतने अमन रायला हॉटेल भाड्याने दिलं. त्यानंतर हॉटेलने ओयोसोबत करार केला आणि त्याचं नाव टाउन हाऊस असं ठेवलं गेलं. अमनने हॉटेलच्या जबाबदाऱ्या पियुष जयस्वालकडे सोपवल्या.
view comments
मराठी बातम्या/Viral/
OYO Hotel ची रूम, नेहमी बंद असायचा दरवाजा; पोलिसांनी तोडला आणि दृश्य पाहून नुसती पळापळ
Next Article