टेलर बाबूने वेळेत शिवले नाही कपडे, महागात पडणार; कोर्टाने दिला मोठा निर्णय
- Published by:Priya Lad
Last Updated:
टेलरने तिला तो लग्नाआधी ब्लाऊज पूर्ण तयार करून देईल असं आश्वासन दिलं. जेव्हा ती पुन्हा ब्लाऊज घेण्यासाठी गेली तेव्हाही तो अपूर्णच होता. तिने कोर्टात धाव घेतली. ग्राहक न्यायालयात जाऊन खटला दाखल केला.
नवी दिल्ली : दिवाळी झाली आता तुळशीचं लग्न झालं की लगीनसराई सुरू होईल. यासाठी कित्येकांची तयारीही सुरू झाली आहे. लग्नाची तयारी म्हणजे सुरुवात होते ती कपड्यांपासून. जेणेकरून ते वेळेत मिळतील. अशीच एक महिला जिने लग्नासाठी ब्लाऊज शिवायला टाकला पण तिला टेलरने तो वेळेत दिला नाही. म्हणून तिने कोर्टात धाव घेतली आणि कोर्टानेही मोठा निर्णय दिला आहे.
गुजरातच्या अहमदाबादमधील हे प्रकरण आहे. एका महिलेने लग्नासाठी साडीवर ट्रेडिशनल ब्लाऊज हवा म्हणून टेलरकडे कापड दिलं आणि अॅडव्हान्स म्हणून 4395 रुपयेही दिले. लग्नाच्या 10 दिवस आधी जेव्हा ती ब्लाउज घेण्यासाठी गेली तेव्हा ब्लाऊज पूर्ण झालेलाच नाही, असं दिसलं. तेव्हा टेलरने तिला तो लग्नाआधी ब्लाऊज पूर्ण तयार करून देईल असं आश्वासन दिलं. जेव्हा ती पुन्हा ब्लाउज घेण्यासाठी गेली तेव्हाही ब्लाऊज अपूर्णच होता.
advertisement
आधीच 5 मुलं, बायको सहाव्यांदा आई होणार; पण पोटात असं काही..., सोनोग्राफी रिपोर्ट पाहून नवरा धक्क्यात
याचं कारण विचारलं असता टेलरकडे कोणतंच उत्तर नव्हतं. लग्नाला जी साडी नेसायची होती ती ब्लाऊज नसल्याने ती नेसूच शकली नाही. तिला वेगळी साडी नेसावी लागली. पण तिने टेलरला सोडलं नाही. तिने कोर्टात धाव घेतली. ग्राहक न्यायालयात जाऊन खटला दाखल केला.
advertisement
टेलरला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. पण तो अहमदाबाद (अतिरिक्त) ग्राहक वाद निवारण आयोगासमोर हजर राहिला नाही. त्यानंतर कोर्टाने टेलरने वेळेवर ब्लाउज न पोहोचवणं हे निष्काळजीपणा आणि सेवेतील त्रुटी असल्याचं म्हटलं. यामुळे महिलेचा मानसिक छळ झाला, असं कोर्टाने सांगितलं. यासाठी कोर्टाने टेलरला 7% वार्षिक व्याज, मानसिक त्रासाची भरपाई आणि खटल्याच्या खर्चासह एकूण 7000 रुपयांचा दंड ठोठावला.
advertisement
पुरुषांना महिलांचं माप घेता येणार नाही?
काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशच्या महिला आयोगाने राज्य सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात महिलांसाठी जीम, योग केंद्र आणि टेलर्सबाबत काही मागण्या करण्यात आल्या होत्या. यात जीम आणि योग केंद्रात महिलांसाठी महिला ट्रेनर तैनात कराव्यात, सीसीटीव्ही सुरू असायला हवेत, सेंटरमध्ये प्रवेशासाठी ओळखपत्राची कॉपी देणं बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली होती.
advertisement
याशिवाय महिलांच्या कपड्यांच्या दुकानावर महिला कर्मचारी असावी आणि पुरुष टेलर्सना महिलांचं कपड्यांसाठी माप घेण्यास मनाई करावी, अशीही मागणी करण्यात आली होती.
advertisement
Location :
Gujarat
First Published :
October 28, 2025 10:16 AM IST


