Shocking! 17 तास उपवास केला आणि आला स्ट्रोक! नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या बायकोसमोर उभा राहिला मृत्यू

Last Updated:

Fasting cause stroke : उपवास सोडणार त्याआधीच रात्री 9.30 च्या सुमारास ती अचानक खालीच कोसळली. तिच्या नवऱ्याने सांगितलं की  तिचा चेहरा एका बाजूला झुकला आणि तिला वॉटर प्युरिफायर सुरू करणंही शक्य झालं नाही.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
मुंबई : काही दिवसांपूर्वीच करवा चौथ झाला. कित्येक महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचं व्रत केलं. यादरम्यान निर्जल उपवास केला आणि नवऱ्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली. नवऱ्यासाठी असाच करवा चौथचा उपवास करणारी विरारमधील एक महिला. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली पण तिच्यासमोर मात्र मृत्यू उभा राहिला. सुदैवाने ती मरणातून वाचली आहे.
33 वर्षांची ही महिला. माहितीनुसार 10 ऑक्टोबर रोजी महिलेने करवा चौथचा उपवास ठेवला होता. पहाटे 4 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत उपवास केला. यादरम्यान खाणं सोडा ती साधं पाणीही प्यायली नाही. उपवास सोडणार त्याआधीच रात्री 9.30 च्या सुमारास ती अचानक खालीच कोसळली. तिच्या नवऱ्याने सांगितलं की  तिचा चेहरा एका बाजूला झुकला आणि तिला वॉटर प्युरिफायर सुरू करणंही शक्य झालं नाही.
advertisement
कुटुंबीयांनी तिला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. जिथं तिला स्ट्रोक आल्याचं निदान झालं. पण तिथं न्यूरोलॉजिस्ट नसल्याने तिला रक्त पातळ करण्याचं थ्रोम्बोलिटिक इंजेक्शन दिल्यानंतर मीरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.
मीडिया रिपोर्टनुसार वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉ. पवन पै यांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की, तिच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धमनीमध्ये एक मोठी रक्ताची गाठ दिसली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता तिची मेकॅनिकल थ्रोम्बेक्टोमी ही तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्याद्वारे ती रक्तगाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. अवघ्या काही तासांत तिच्या शरीराच्या डाव्या बाजूच्या हालचालीत सुधारणा झाली आणि वेळेवर उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला.
advertisement
डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत सांगितलं की, डिहायड्रेशन हेच स्ट्रोकचं प्राथमिक कारण होते. डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होतं आणि यामुळे रक्त गोठून स्ट्रोकचा धोका वाढतो.
ही घटना करवा चौथची असली. तरी वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने डॉक्टरांनी लोकांना जागरूक करण्यासाठी या प्रकरणाबाबक माहिती दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Shocking! 17 तास उपवास केला आणि आला स्ट्रोक! नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या बायकोसमोर उभा राहिला मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement