तरुणीने ठुमके लगावत दाखवला कातिलाना अंदाज; पण हे काय, तिच्याऐवजी मागचा तरुण फेमस झाला, का? Watch Video

Last Updated:

Girl Dance Video : तिच्यासमोर असलेले सगळे जण टाळ्या वाजवून तिचं कौतुक करतात. तिच्या किलर डान्स मूव्हज, एक्सप्रेशन आणि ग्रेस कमाल आहे. पण नंतर कॅमेरा तिच्याच मागे बसलेल्या लाल कुर्ता घातलेल्या एका तरुणाकडे जातो.

News18
News18
नवी दिल्ली : सोशल मीडियावर कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. एका तरुणीच्या डान्सचा हा व्हिडीओ. तरुणीने ठुमके लगावत आपला कातिलाना अंदाज दाखवला आहे. पण या तरुणीचे ठुमके राहिले बाजूला, या व्हिडीओत तिच्या मागे बसलेल्या एका तरुणाकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या. आता का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग व्हिडीओ पाहुयात.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका ऑफिसचा हा व्हिडीओ आहे. ज्यात दिवे आणि डेकोरेशन केलेलं दिसतं आहे. यावरून ऑफिसमधील दिवाळी पार्टीचा हा व्हिडीओ असावा. कर्मचारीही ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसत आहे. एक पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी डान्स करत आहे.
advertisement
माधुरी दीक्षितचं 'आजा नाच ले, नाच ले, मेरे यार तू नाच ले' हे गाणं ऐकायला येतं आणि मुलगी त्यावर ठुमके लगावते. तेव्हा तिच्यासमोर असलेले सगळे जण टाळ्या वाजवून तिचं कौतुक करतात. तिच्या किलर डान्स मूव्हज, एक्सप्रेशन आणि ग्रेस कमाल आहे. पण नंतर कॅमेरा तिच्याच मागे बसलेल्या लाल कुर्ता घातलेल्या एका तरुणाकडे जातो. लॅपटॉपसमोर बसलेला हा तरुण नाचणाऱ्या मुलीपेक्षा अधिक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो.
advertisement
ऑफिसमधील सगळे नाचण्यात, गाण्यात आणि उत्सवात मग्न असताना, हा तरुण मात्र त्याच्या लॅपटॉपवर काम करण्यात बिझी होता. लोकांना हे दृश्य इतकं मजेदार वाटलं की आता सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे.
advertisement
हा व्हायरल व्हिडिओ @sparkling_osheen नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत. तुमचं लक्ष कुणाकडे गेलं, तरुणीकडे की तरुणाकडे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
तरुणीने ठुमके लगावत दाखवला कातिलाना अंदाज; पण हे काय, तिच्याऐवजी मागचा तरुण फेमस झाला, का? Watch Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement