advertisement

आई मला माफ कर...बारामतीत 23 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; नोट वाचून पोलीसही हादरले

Last Updated:

विक्रमला वारंवार फोन करून मानसिक त्रास देणे व ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

News18
News18
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील रुई बयाजीनगर येथे प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तरुणी आणि तिच्या पालकांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय 23 रा. रुई बयाजीनगर, ता. बारामती) असे आहे. विक्रमचे मामा सत्यवान आप्पा इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तरुणी आणि तिच्या पालकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108, 351(2), 351(3), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम आणि तरुणी यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरुवातीला तरुणीने विक्रमला लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे सांगत तिने लग्नास नकार दिला. त्यानंतर 27 डिसेंबर 2025 पासून तरुणी व तिची बहीण यांनी विक्रमला वारंवार फोन करून मानसिक त्रास देणे व ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
advertisement

नातेवाईकांना फोन करून दमदाटी 

फिर्यादीनुसार, विक्रमला पुण्यात बोलावून त्याच्या मोबाईलमधील फोटो आणि चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आले. तसेच, जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तरुणीच्या वडिलांनी विक्रमच्या नातेवाईकांना फोन करून दमदाटी केल्याचेही सांगण्यात आले आहे.

सुसाईड नोटमध्ये काय म्हणाले?

दरम्यान, 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी विक्रमने आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आई मला माफ कर.... मला ब्लॅकमेल करून खूप मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे, असा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चिठ्ठीत संबंधित व्यक्तींनी दिलेल्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख असल्याचेही समोर आले आहे.
advertisement

घटनेमुळे परिसरात हळहळ

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल आनंद कदम करत असून, सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आई मला माफ कर...बारामतीत 23 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; नोट वाचून पोलीसही हादरले
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement