वाटलं हुशार होईल पोरगा! 6 वर्षांच्या मुलासाठी घेतलं पुस्तक, पण उघडताच आईला 440 व्होल्टचा झटका
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman shocked see inside book buy for son : तिने पुस्तक घरी आणलं तेव्हा ते उघडलं. आतील मजकूर जेव्हा तिने वाचला तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली.
नवी दिल्ली : कितीतरी पालक आहेत, जे अगदी लहानपणापासून मुलांना पुस्तकाची, वाचनाची, अभ्यासाची, नवीन नवीन शिकायची आवड लागावी म्हणून पुस्तकं आणून देतात. आपली मुलं हुशार व्हावीत म्हणून वेगवेगळ्या पुस्तकांचा खजिना मुलांना देतात. अशीच एक आई जिला तिचा मुलगा हुशार व्हावा असं वाटत होतं. म्हणून तिने एक पुस्तक घेतलं पण ते उघडताच तिलाच मोठा धक्का बसला.
एक महिला जिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने तिच्या 6 वर्षांच्या मुलासाठी एक पुस्तक घेतलं. पुस्तकाचं कव्हर पाहूनच तिने ते खरेदी केलं. त्याच्या आत काय आहे ते तिने पाहिलंही नाही. हे पुस्तक वाचून आपला मुलगा हुशार होईल असं तिला वाटलं. तिने पुस्तक घरी आणलं तेव्हा ते उघडलं. आतील मजकूर जेव्हा तिने वाचला तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली.
advertisement
आधीच 5 मुलं, बायको सहाव्यांदा आई होणार; पण पोटात असं काही..., सोनोग्राफी रिपोर्ट पाहून नवरा धक्क्यात
मुखपृष्ठावर एक लहान मूल होतं आणि पुस्तकाचं शीर्षक होतं, 'हाउ आई बिगिन'. महिला म्हणाली, "माझा मुलगा 6 वर्षांचा आहे, तो सध्या परीकथा आणि मूलभूत जीवशास्त्र या अवस्थेत आहेत. मला वाटलं होतं की हे पुस्तक वाचून त्याला विज्ञानाचं मूलभूत ज्ञान मिळेल, पण..."
advertisement
त्या पुस्तकात मानवी शरीरातील प्रजनन अवयव, प्रक्रिया, लैंगिक आरोग्य याचं ग्राफिक वर्णन होतं. आईने पोस्टमध्ये लिहिलं, ही घटना भारतीय पालकांना हादरवून टाकणारी आहे, जिथं पालक मुखपृष्ठ पाहूनच पुस्तकं घेतात.
advertisement
@mindful_ma_pa इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ. ही पोस्ट सोशल मीडियावर #ParentingMistakes आणि #AgeAppropriateBooks या हॅशटॅगसह ट्रेंड करत आहे. एका युझरने त्यालाही आलेला असाच अनुभव मांडला. त्याने सांगितलं "माझ्या मुलीसोबतही असंच घडलं. पुस्तकात 'बाळ कसं जन्माला येतं' यावर एक प्रकरण होते, पण पद्धत इतकी थेट होती की मुलगी गोंधळून गेली." त्याच वेळी एका वडिलांनी शेअर केलं, "आपल्या ठिकाणी लैंगिक शिक्षण निषिद्ध आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करणं देखील चुकीचं आहे. 10-12 वर्षापासून मुलांना याबाबत सौम्य पद्धतीने माहिती द्यायला सुरुवात करा."
advertisement
महिलेनेफक्त मुखपृष्ठ पाहूनच मुलांसाठी पुस्तकं खरेदी करू नका असा सल्ला दिला आहे. तसंच पोस्टच्या शेवटी एक प्रश्न विचारला, "तुमच्या मते, या विषयांवर कोणत्या वयात चर्चा करावी?" बहुतेकांनी 12-13 वर्षे सुचवली, तर काहींनी 8 वर्षे म्हटलं आहे. वर्षापासून सुरुवात करावी. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 29, 2025 7:46 AM IST
मराठी बातम्या/Viral/
वाटलं हुशार होईल पोरगा! 6 वर्षांच्या मुलासाठी घेतलं पुस्तक, पण उघडताच आईला 440 व्होल्टचा झटका


