हातही नीट जात नव्हता एवढासा खड्डा, त्यात पडला पप्पी; पोलिसांनी कसं वाचवलं, VIDEO पाहाच

Last Updated:

Police Rescue Dog Video : हा खड्डा इतका लहान आहे की त्यात एक हात जाणंही मुश्किल. या खड्ड्यात पडला आहे तो एक कुत्रा, कुत्र्याचं छोटं पिल्लू. ज्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी धडपड केली.

News18
News18
नवी दिल्ली : खड्ड्यात लहान मूल पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांच्या काही बातम्या तुम्हाला माहिती असतील. पण याच खड्ड्यात एखादं कुत्र्याचं पिल्लू पडलं तर... आणि हा खड्डाही इतका लहान की एक हातही त्यात नीट जात नसेल तर... अशाच खड्ड्यात पडलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी पोलिसांनी धडपड केली. त्यांनी त्याला सुखरूपरित्या बाहेरही काढलं.
खड्ड्यात पडलेल्या कुत्र्याच्या रेस्क्यूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावर एक छोटासा खड्डा आहे, ज्यात पाईप टाकला आहे. हा खड्डा इतका लहान आहे की त्यात एक हात जाणंही मुश्किल. पण या खड्ड्यात पडला आहे तो एक कुत्रा, कुत्र्याचं छोटं पिल्लू. ज्याला वाचवण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.
advertisement
एवढ्याशा खड्ड्यातून कुत्र्याला बाहेर काढायचं तरी कसं? असा प्रश्न. आपण पाहिलं तर हे शक्यच नाही असं वाटतं. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक पोलीस अगदी रस्त्यावर बसला आहे, त्याच्या हातात कोयता आहे आणि त्याने तो त्या खड्ड्यातील पाइप कापतो. त्यात एक हुक असलेली सळी टाकली जाते. पण त्यानेही काही कुत्रा बाहेर काढता येत नाही.
advertisement
शेवटी मग एक पातळ असा पाइप घेतला जातो ज्यात एक दोरी टाकली जाते. हा पाइप मग त्या खड्ड्यात सोडला जातो. मोबाईल टॉर्चने खड्ड्यात प्रकाश सोडला जातो.
advertisement
मग दोरी त्या कुत्र्याच्या गळ्यात टाकून त्याला हळुवारपणे वर खेचलं जातं. बऱ्याच तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूपरित्या त्याला बाहेर काढलं जातं. पिल्लाची आई तिथंच होती. आपलं पिल्लू कधी बाहेर काढत आहेत, याचीच ती वाट पाहत होती. जसं पिल्लू बाहेर येतं तसं ती त्याला चाटते, त्याला कुठे लागलं तर नाही ना हे तपासते.
advertisement
thebetterindia.hindi इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना तामिळनाडूतील आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
हातही नीट जात नव्हता एवढासा खड्डा, त्यात पडला पप्पी; पोलिसांनी कसं वाचवलं, VIDEO पाहाच
Next Article
advertisement
BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

  • मेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला

  • काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत

View All
advertisement