Cobra Vs Python Vs Anaconda : कोब्रा, अजगर की अ‍ॅनाकोंडा; कोण सगळ्यात खतरनाक?

Last Updated:

Cobra Vs Python Vs Anaconda : किंग कोब्रा, अजगर आणि अ‍ॅनाकोंडा, हे प्रत्येक सरपटणारे प्राणी आपापल्या पद्धतीने शक्तिशाली आहेत. पण जर आपण त्यांची थेट तुलना केली तर सर्वात धोकादायक कोणता आहे?

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : सध्या अजगर, अ‍ॅनाकोंडा हे चांगलेच चर्चेत आहेत. सापांचे हे प्रकार. सापांमध्ये म्हणाल तर किंग कोब्रा सगळ्यात विषारी असं म्हटलं जातं. अजगराला पाहिलं तरी धडकी भरते. कोब्रा आणि अजगर तसे प्रत्यक्षात पाहायला मिळतील पण अ‍ॅनाकोंडाला तर आपण प्रत्यक्षात नाही पण फिल्ममध्ये पाहिलंच आहे. मग आता या तिघांमध्ये सगळ्यात जास्त डेंजर कोण आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
किंग कोब्रा, अजगर आणि अ‍ॅनाकोंडा, हे प्रत्येक सरपटणारे प्राणी आपापल्या पद्धतीने शक्तिशाली आहेत आणि वेगवेगळ्या कौशल्यांचा वापर करून त्यांच्या प्रदेशावर राज्य करतात. पण जर आपण त्यांची थेट तुलना केली तर सर्वात धोकादायक कोणता आहे? आपण पाहुयात.
आकार, वजन, ताकद
लांबी आणि वजन या तिघांमध्ये अ‍ॅनाकोंडा सर्वात मोठा आहे. ब्रिटानिकाच्या अहवालानुसार किंग कोब्रा 18 फूटांपर्यंत वाढू शकतो. अजगर किंग कोब्रापेक्षा लांब वाढू शकतात आणि त्यांच्या मजबूत, स्नायूंच्या शरीरामुळे ते खूप जड असतात. त्या तुलनेत किंग कोब्रा लांब पण सडपातळ असतो. तर अ‍ॅनाकोंडा 20 फूटांपेक्षा जास्त आणि कधीकधी 30 फुटांपर्यंतही पोहोचू शकतो. ते खूप जड असतात.
advertisement
शिकार करण्याची पद्धत
तिन्ही साप सर्वोत्तम भक्षक आहेत, पण ते वेगवेगळ्या प्रकारे शिकार करतात. किंग कोब्रा आपल्या भक्ष्याला मारण्यासाठी विषाचा वापर करतो. फक्त एका दंशात मोठ्या प्राण्याला मारण्यासाठी पुरेसं विष बाहेर पडतं. तो पटकन हल्ला करतो आणि चावण्यापूर्वी अनेकदा त्याचे डोकं डोळ्याच्या पातळीवर उचलतो. अजगर आणि अ‍ॅनाकोंडा विष वापरत नाहीत. त्याऐवजी ते त्यांच्या भक्ष्याभोवती विळखा घालून श्वास कोंडेपर्यंत दाबून मारतात.
advertisement
वेग आणि हालचाल
वेगाच्या बाबतीत किंग कोब्रा आणि अ‍ॅनाकोंडा दोघंही जमिनीवर सुमारे 5 मैल प्रतितास वेगाने फिरू शकतात.  ऑनलाइन स्त्रोतांनुसार अ‍ॅनाकोंडा पाण्यात खूप वेगवान असतो, 10 मैल प्रतितासपर्यंत वेग गाठतो. किंग कोब्रा जमिनीवर जलद असतात आणि विशेषतः जंगली भागात चांगले चढू शकतात. अजगर देखील चढू शकतात, पण मोठे अजगर सहसा जमिनीवरच राहतात.
advertisement
वैशिष्ट्य आणि खासियत
किंग कोब्रा त्याच्या फणाबद्दल ओळखला जातो, जो तो धोक्यांना घाबरवण्यासाठी पसरवतो. तो आपलं डोक वर करतो, फणा उडवतो आणि हल्ला करण्यापूर्वी इशारा म्हणून फुसफुसतो. तर अ‍ॅनाकोंडा त्यांच्या आकारावर आणि लपून राहण्याच्या क्षमतेवर जास्त अवलंबून असतात. त्यांची काळी, नक्षीदार त्वचा त्यांना दलदलीच्या भागात मिसळण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांना ओळखणं कठीण होतं. त्यांचा प्रचंड आकार बहुतेक भक्षकांना दूर ठेवण्यास देखील मदत करतो.
advertisement
आयुर्मान आणि अधिवास
एका वृत्तानुसार, किंग कोब्रा बहुतेकदा आशियाई जंगलात आढळतात आणि 20 वर्षांपर्यंत जगू शकतात. अजगरही याच ठिकाणी राहतात पण अनेक ठिकाणी त्यांना पाळीव प्राणी म्हणून देखील ठेवलं जातं. काही अजगर प्रजाती 30 वर्षांपर्यंत जगू शकतात. अ‍ॅनाकोंडा हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील आहेत आणि दलदलीच्या, ओल्या प्रदेशांत असतात. त्यांचे आयुष्य प्रजातींवर अवलंबून असतं, पण ते दीर्घ आयुष्य जगतात.
advertisement
कोण जास्त खतरनाक?
थोडक्यात तिन्ही साप स्वतःहून शक्तिशाली भक्षक आहेत, मग ते किंग कोब्राचे प्राणघातक विष असो, अजगराची कुरतडण्याची ताकद असो किंवा अ‍ॅनाकोंडाचा अतुलनीय आकार आणि गुप्तता असो. पण थेट सामना करताना, अ‍ॅनाकोंडाची शारीरिक शक्ती कदाचित भारी ठरेल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Cobra Vs Python Vs Anaconda : कोब्रा, अजगर की अ‍ॅनाकोंडा; कोण सगळ्यात खतरनाक?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement