गणपती बाप्पा वाटला, हत्तीला पाहताच चिमुकलीने केला नमस्कार; पुढे घडलं ते थक्क करणारं

Last Updated:

Elephant Little Girl Video Viral : समोरून एक भलामोठा हत्ती आला. चिमुकली त्याच्याजवळ गेली आणि हात जोडून त्याला नमस्कार केला. तेव्हा हत्तीही तिच्याजवळ आला.

News18
News18
नवी दिल्ली : गेल्या महिन्यातच गणपती बाप्पा येऊन गेले. आपण आपल्या घराच्या देव्हाऱ्यात गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती ठेवून दररोज त्यांची पूजा करतो. एखादा हत्ती दिसला की आपल्याला गणपती बाप्पाचीच आठवण येते. मग लहान मुलांना तर हा हत्तीही गणपती बाप्पाच वाटतो. अशीच एक चिमुकली जिच्यासमोर हत्ती आला. गणपती बाप्पासमोर हात जोडावेत तसे तिने हत्तीसमोर हात जोडले आणि त्याला नमस्कार केला. त्यानंतर जे पुढे घडलं ते आणखी थक्क करणारं आहे.
लहान मुलं आणि गणपत्ती बाप्पाचं तर एक वेगळंच कनेक्शन. गणपती बाप्पा लहान मुलांचा लाडका. मग बाप्पा कुठेही दिसो मुलांचे हात आपसूकच जोडले जातात. आता याच व्हिडीओत पाहा. एक मुलगी आपल्या वडिलांसोबत रस्त्याने जात होती. समोरून एक भलामोठा हत्ती आला. चिमुकली त्याच्याजवळ गेली आणि हात जोडून त्याला नमस्कार केला. तेव्हा हत्तीही तिच्याजवळ आला.
advertisement
आता इतका मोठा अवाढव्य हत्ती, पाहून मोठ्यांनाही भीती वाटेल. ही तर चिमुकली सुरुवातीला ती थोडी घाबरली. तिने महावताकडे पैसे दिले. तसा हत्ती तिच्या जवळ आला तेव्हा तिला भीती वाटली. हत्तीने सोंड उचलली, पण जशी चिमुकली घाबरली तशी त्यानेही आपली सोंड मागे केली. पण चिमुकली तिथून पळून वगैरे गेली नाही. तिने हिंमत करत हत्तीसमोर हात जोडून मान झुकवत नमस्कार केला. तेव्हा हत्तीने आपली सोंड उचलून तिच्या डोक्यावर ठेवत तिला आशीर्वाद दिला.
advertisement
advertisement
@comedyculture.in इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
गणपतीला कसं मिळालं हत्तीचं रूप?
गणेशाच्या जन्माची कथा तर तुम्हाला माहितीच आहे. शिवपुराणानुसार देवी पार्वतीने आपल्या अंगावरील मळाचा एक पुतळा तयार केला होता. त्यांनी नंतर पुतळ्यात प्राण आणले. अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला. यानंतर माता पार्वतीने गणेशाला घराच्या दारातून कोणालाही आत येऊ देऊ नये, अशी आज्ञा केली. गणेशजी दारात उभे असतानाच शिवाचं आगमन झालं. गणेशाने शंकराला आत जाण्यापासून रोखले. यावर शिवाने क्रोधित होऊन गणेशाचे डोके धडा वेगळं केलं.
advertisement
पार्वती बाहेर आली तेव्हा गणेशाला मृत पाहून आक्रोश करू लागली आणि गणेशाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. तेव्हा शिवाने गरुडाला उत्तर दिशेला जाण्याची आज्ञा दिली आणि सांगितलं की, जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली आहे, त्या बाळाचं डोकं आणा. तेव्हा गरुडाने हत्तीच्या बाळाचं डोकं आणलं. भगवान शिवांनी ते मुलाच्या शरीराला जोडलं. त्यात त्यांनी प्राण आणलं. अशा प्रकारे गणेशाला हत्तीचं शीर मिळालं.
मराठी बातम्या/Viral/
गणपती बाप्पा वाटला, हत्तीला पाहताच चिमुकलीने केला नमस्कार; पुढे घडलं ते थक्क करणारं
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement