माणसासारखा बोलणारा पोपट आता मोबाईलही वापरू लागला, चोचीने कसा चालवतो फोन पाहा VIDEO

Last Updated:

Parrot used mobile phone : माणसांना तर मोबाईलचं वेड, व्यसन जडलंच आहे. पण आता प्राणीपक्षीही याला अपवाद ठरले नाहीत. मोबाईल वापरणारा एक पोपट सध्या चर्चेत आला आहे.

रवी सपाटे, प्रतिनिधी/ गोंदिया : मोबाईल म्हणजे हल्ली प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा सदस्यच म्हणावा लागेल. कित्येकांच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट मोबाईलशिवाय होतच नाही. दिवसभर मोबाईल लागतो. माणसांना तर मोबाईलचं वेड, व्यसन जडलंच आहे. पण आता प्राणीपक्षीही याला अपवाद ठरले नाहीत. मोबाईल वापरणारा एक पोपट सध्या चर्चेत आला आहे.
पोपट जो माणसासारखा बोलतो. आता तो चक्क माणसासारखा मोबाईल वापरतानाही दिसला आहे. गोंदियातील एका घरातील हा पोपट आहे. जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर गावातील विजय रातपूत यांचा हा पोपट. जो मोबाईलच्या प्रेमात पडला आहे. तो स्वत: मोबाईल वापरताना दिसला.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता तो मोबाईलवर चोच आपटून मोबाईल ऑपरेट करताना दिसतो आहे. मोबाईलवर गाणी लावतो आणि अगदी शांतपणे ती ऐकतो आहे. जसं कुणी मोबाईलच्या जवळ येतं किंवा त्याला मोबाईलपासून दूर करायचा प्रयत्न करतं, तेव्हा तो पोपट त्याला चावायला जातो. कुणालाही मोबाईल आणि स्वतःजवळ येऊ देत नाही. मोबाईलला कुणाला साधा हातही लावायला देत नाही.
advertisement
याआधी मोबाईल वापरणाऱ्या अशाच एका माकडाचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक माकड बेडवर आरामात पडलेलं आहे आणि माणसांसारखं रिल्स स्क्रोल करताना दिसत आहे. जे पाहिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ जुना असला तरी चांगलाच व्हायरल होत आहे. कोट्यवधी वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे, लाखो लोकांनी तो लाइक केला आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Mb Sidhu (@i__con_01)



advertisement
यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की, हे बघून समजलं की माकडं खरंच आपले पूर्वज आहेत. दुसर्‍याने लिहिलं, तर टच स्क्रीन कशी काम करते हे त्यांना माहीत आहे असं दिसतंय. याशिवाय इतर अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी बातम्या/Viral/
माणसासारखा बोलणारा पोपट आता मोबाईलही वापरू लागला, चोचीने कसा चालवतो फोन पाहा VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement