असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो होळीचा आहे. खरंतर मित्रासोबत मस्ती करताना काही मित्रांनी असं पाऊल उचललं की त्याचे किती भयंकर परिणाम होतील याचा विचार केला नाही. पण त्यांच्या या मस्करीची कुस्करी झाली.
खरंतर काही मित्रांनी मिळून त्यांच्यातील एका मित्राला उचलून होळीत टाकण्याचा विचार केला. या मुलांना वाटलं की होळी जळून आता थंड झाली आहे आणि त्याची फक्त राख उरली असावी. ज्यामुळे ते आपल्या मित्राला त्या जळत्या होळीत टाकतात आणि तेथून निघून जातात.
advertisement
पण होळीत टाकताच क्षणी त्या मुलाला जळल्याच्या वेदना होतात. तो कसाबसा करुन त्या होळीतून बाहेर येतो. खरंतर या मुलाला खूप भाजलं आहे. पण याची जाणीव त्याच्या मित्रांना होतच नाही.
ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ज्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ नोएडामधील गौरसिटी गॅलेक्सी 1 चा आहे. काही मुलांनी खोडकरपणे आपल्याच मित्राला जळत्या आगीत टाकले. मुलाचे दोन्ही पाय गंभीररित्या भाजले.
जवळपास शेकडो लोकांची गर्दी होती. सर्वजण होळीच्या रंगात तल्लीन होऊन होळी खेळताना दिसत होते. सध्या सुदैवाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी होलिका दहनाची आग बरीच कमी झाली होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.