इंस्टाग्राम अकाउंटचा डिजिटल निर्माता अभिषेक (@thefoodiehat) अनेकदा फॅक्टरीमध्ये जाऊन वस्तू बनवण्याचे रेकॉर्डिंग करतो आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो नेलपॉलिश कारखान्याच्या आतील आहे. नेलपॉलिश बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे आणि हे काम कसं केलं जातं हे या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
नेलपॉलिश बनवण्याची पद्धत
advertisement
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्वात आधी नेलपॉलिशवर प्रक्रिया केली जात आहे. जेव्हा त्याचे द्रावण तयार होतं, तेव्हा ते इतर काही पदार्थात मिसळलं जातं आणि नंतर एका छोट्या प्लास्टिकच्या बाटलीत भरलं जातं. यानंतर काचेच्या छोट्या बाटल्यांमध्ये हाताने भरलं जात आहे. नंतर त्यावर झाकण ठेवून ते पॅक केलं जाते. शेवटी ती मुलगी नखांवर ती नेलपॉलिश लावताना दिसते.
व्हिडीओ प्रतिक्रिया काय?
या व्हिडिओला 1.5 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकानं सांगितलं की नेलपॉलिशमुळे ती जागा कशी दुर्गंधीयुक्त असावी हे त्याच्या लक्षात आलं. एकाने सांगितलं की त्याने प्रथमच नेलपॉलिशची पूर्णपणे रिकामी बाटली पाहिली. एकानं सांगितलं की ही खूप मेहनत आहे. एकाने सांगितलं की, हे लोक दाखवणार नाहीत की त्यात किती रसायने मिसळली असतील, त्यानंतर ही नेलपॉलिश बनवली असेल.
तुमची या व्हिडिओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.