एका बर्थडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या बर्थडेसाठी ठेवलेली ही जंगी पार्टी. एखादं लग्न वाटावं इतकी ही मोठी पार्टी, व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातील एक कपल दिसतं. महिलेने व्हाइट कलरचा गाऊन घातला आहे आणि डोक्यावर प्रिन्सेससारखा ताज. दोघंही हातात स्पार्कल गन घेऊन आतिषबाजी करताना दिसतात. तसंच आकाशातही फटाके फुटतात. दोघंही मोठा केक कापतात. नवरा आपल्या बायकोला मोठा हार घालतो. हे पाहून कौतुक वाटतं. पण थांबा पिक्चर अभी बाकी है.
advertisement
भारतीय नवरा हवाय! हातात बोर्ड घेऊन फिरतेय अमेरिकन तरुणी
शेवट पाहाल तर तुम्ही पाहतच राहाल. शेवटी बायको खुर्चीजवळ उभी दिसते आणि तिच्यासमोर उभा असलेला नवरा हातावर धूप पेटवून त्याने आपल्या बायकोला ओवाळतो, तिची आरती करतो. हे पाहून बायकोच्याही डोळ्यात पाणी येतं.
advertisementView this post on Instagram