ही घटना एका एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडली. प्रवाशांनी पाहिले की शौचालयाचे दार तब्बल सहा तास बंदच होतं. आतून कोणतीही हालचाल किंवा आवाज ऐकू न आल्याने प्रवासी आणि कर्मचारी दोघांनाही शंका आली की काहीतरी गडबड आहे. शेवटी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तो दरवाजा तोडायचे ठरवले.
दार उघडल्यावर समोर जो नजारा दिसला त्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. आत एक व्यक्ती पूर्णपणे नशेत बसली होती. कर्मचाऱ्यांनी त्याला ओढून ट्रेनबाहेर उतरवले. हे पाहून काही प्रवासी हसू लागले, तर काहीजण त्याच्या वागण्यावर चिडले.
advertisement
ही संपूर्ण घटना एका प्रवाशाने मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकली. काही तासांतच व्हिडीओ व्हायरल झाला आणि लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. कुणीतरी लिहिलं, "भाईसाहेबांनी बाथरूमला बार बनवलाय बहुतेक." तर दुसऱ्या एका यूजरने मजेत लिहिलं, "सहा तासांची मेहनत वाया गेली."
हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर जोरदार शेअर होत आहे. एका युजरने कमेंट केली, "कदाचित बिचाऱ्याला सीट मिळाली नसेल म्हणून टॉयलेटमध्येच झोपला असेल. त्याचीही मजबुरी असेल." तर दुसऱ्या एका कमेंटमध्ये लिहिलं होतं, "दारु पिऊन इतका गाढ झोपला होता की त्याला काही समजलंच नाही. एक दिवस त्याचा हा फोटो किंवा व्हिडीओ पाहून त्याला नक्कीच हसू येईल."