इंदौरचे हॉटेल व्यावसायिक जाकेश साहनी हे आपली पत्नी रिता यांना घेऊन 27 जुलै रोजी रॉयल कॅरेबियन ‘स्प्रेक्ट्रम ऑफ द सीज’ने सिंगापूरहून रवाना झाले होते. ही क्रूझ फुकेटहून पेनांगला जाणार होती. 70 वर्षीय जाकेश साहनी आणि 64 वर्षीय रिता यांनी 30 जुलै रोजी एकत्र डिनर केलं. त्यानंतर दोघंही आपल्या रूममध्ये गेले.
advertisement
पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा असूनही काही सेलिब्रेटी टोकाचा निर्णय का घेतात? पाहा महत्त्वाचं कारण
मात्र 31 जुलैच्या सकाळी जाकेश झोपेतून जाते झाले असता त्यांना रिता कुठेही दिसल्या नाहीत. त्यांनी अख्खी क्रूझ पालथी घातली, सर्वत्र चौकशी केली. मात्र रिता यांच्याबाबत काही माहिती मिळाली नाही. मग क्रूझच्या स्टाफकडूनही शोधमोहीम राबविण्यात आली. याबाबत त्यांचा मुलगा अपूर्व याला माहिती मिळाली असता त्याने ट्विट करून परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली. स्थानिक खासदार शंकर लालवानी यांनीदेखील यासंदर्भात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी बातचीत केली.
'मी खूप हट्टी आहे, सर्वांना कोर्टात खेचेन!' 19 वर्षीय तरुणीचा Video Viral
क्रूझ व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, रिता यांनी समुद्रात उडी घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र त्यांनी आत्महत्या केली असं स्पष्टपणे बोललं जाऊ शकत नाही. शिवाय 'त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती किंवा त्यांच्या आयुष्यात काही अडचणही नव्हती त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रश्नच येत नाही', असं त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आता समुद्रात रिता यांची शोधमोहीम सुरू आहे. जाकेश साहनी यांना सिंगापूरमध्येच थांबवण्यात आलं असून त्यांचा मुलगा अपूर्वदेखील सिंगापुरात दाखल झाला आहे.
