पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा असूनही काही सेलिब्रिटी टोकाचा निर्णय का घेतात? पाहा महत्त्वाचं कारण

Last Updated:

पैसा, प्रसिद्धी आणि  प्रतिष्ठा कमावलेल्या व्यक्तींनी टोकाचा निर्णय घेण्याचं हे एकमेव उदाहरण नाही.

+
News18

News18

डोंबिवली, 2 ऑगस्ट :  धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला अनेक प्रश्न पडलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरे कधी सोडवली जातात. तर कधी मनुष्य त्याच प्रश्नांमध्ये स्वतःच गुंतत जातो आणि त्याचा मनावर खोल परिणाम होत असतो. परिणामी माणूस टोकाचं निर्णय घेतो आणि क्षणात होत्याचं नव्हतं होत. असाच धक्कादायक निर्णय कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी घेतला आणि जीवन यात्रा संपवली.
पैसा, प्रसिद्धी आणि  प्रतिष्ठा कमावलेल्या व्यक्तींनी टोकाचा निर्णय घेण्याचं हे एकमेव उदाहरण नाही. यापूर्वीही अनेकांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. या व्यक्तींनी हा निर्णय घेण्याचं कारण काय आहे? याचं विश्लेषण मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांनी केलं आहे.
टोकाचं निर्णय घेणे हा काही मानसिक कोंडीचा स्फोट असू शकतो. प्रत्येक कलाकार हा माणूस आहे. त्यालाही अनेक ताण तणावाला सामोरे जावे लागते. ताण तणाव आहे असे जाणवल्यानंतर त्यावर योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. या उपचारानंतर  टोकाच्या निर्णयापासून आपण  स्वतःला रोखू शकतो.
advertisement
सेलिब्रेटींचे ताण
सेलिब्रिटींचं आयुष्य वरवर छान दिसत असलं तरी त्यांना अनेक ताण सहन करावे लागतात. त्यांचे बिझी रुटीन, आर्थिक कोंडी, व्यसनाधीनता, वैयक्तिक कारणं यापैकी कोणतेही एक कारण त्यांना टोकाचा निर्णय घेण्यास भाग पाडू शकतं, अशी माहिती डॉ. पाध्ये यांनी दिली.
advertisement
काय आहे उपाय?
कोणत्याही मानसिक समस्ये मागे बायो, सायको आणि  सोशल फॅक्टर असतात. मेंदूमध्ये होणारे रासायनिक बदल त्याला कारणीभूत असतात. रासायनिक घटकांचा प्रमाण कमी झाले तरी असे निर्णय घेतले जातात. त्यामुळे औषध उपचार हा प्रभावी उपाय आहे. या सगळ्यामुळे विचार करण्याच्या पद्धतीत फरक पडावा यासाठी कौन्सिलिंगचही तितकीच गरजेचं आहे, असं पाध्ये यांनी सांगितलं.
advertisement
योग्य वेळी आणि योग्य कालावाधीसाठी उपचार घेणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर काही हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहेत. त्या नंबरवर कुणाशी तरी बोला आणि मन मोकळं करा. स्वतःच विचार करत बसणे आणि त्यानंतर त्यावर उपाय सापडला नाही की टोकाचे पाऊल उचलणे असे करू नका असं आवाहन डॉ. पाध्ये यांनी केलंय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा असूनही काही सेलिब्रिटी टोकाचा निर्णय का घेतात? पाहा महत्त्वाचं कारण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement