Nitin Desai : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं आयुष्य; कलाविश्वात खळबळ
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. कर्जत येथील एनडी.डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी त्यांचं आयुष्य संपवलं.
मुंबई, 02 ऑगस्ट : मराठी सिनेसृष्टीसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी  आत्महत्या केली. कर्जत येथील एनडी.डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी त्यांचं आयुष्य संपवलं. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण सिनेसृष्टी हादरून गेली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.   हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीत त्यांनी अनेकवर्ष महत्त्वाची कामगिरी बजावली होती. 1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' सारख्या मोठ्या कलाकृतींसाठी त्यांची काम केलं होतं. अनेक ऐतिहासिक मालिकांसाठी त्यांनी अनेकदा भव्य कलाकृती उभारल्यात.
नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये जवळपास 10 तासांपुर्वी आत्महत्या केलीय. पोलिसांना स्टुडिओतून फोन आल्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली. स्टुडिओमध्ये कोणतीही सुसाईड नोट अजून तरी सापडली नाहीये.
प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचे पंचनाम्यात निष्पन्न झालं आहे.
नितीन देसाई यांचा जन्म 9 ऑगस्ट 1965 रोजी कोकणातील दापोली या ठिकाणी झाला. प्रसिद्ध कला दिग्दर्शक, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. अनेक सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. परिंदा, डॉन, माचिस, देवदास, लगान सारखे अनेक भव्यदिव्य सिनेमांसाठी त्यांनी काम केलं.
advertisement
हेही वाचा -  तुझे मेरी कसम! रितेश-जेनिलियाचा पहिला सिनेमा 20 वर्षात एकदाही TVवर प्रदर्शित का नाही झाला? कारण आलं समोर
"मला काही सुचत नाही. थरथरायला झालं आहे. मी गलबलून गेलोय. गेल्या काही महिन्यात माझं आणि नितीन दादाचं बोलणं चालू होतं. नव्या प्रोजेक्टसाठी आमचं बोलणं सुरू होतं. नितीन दादा गेल्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. दादाने असं का केलं हे माहिती नाही पण यानं माझंही वैयक्तिक नुकसान झालं आहे. मला याक्षणी काय बोलावं हे सुचत नाही", अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक, अभिनेते अभिजीत पानसे यांनी दिली.
advertisement
"खूप वर्ष आम्ही काम केलं. शिवाजी महाराजांवरची पहिली मालिका पूर्ण करण्यासाठी नितीन दादांची मोठा जबाबदारी होती. फायटिंग स्पिरिट असलेल्या माणसाबद्दल असं ऐकायला मिळणं खूप धक्कादायक होतं. बॉलिवूडमध्ये त्यांनी जे काम केलं हे उल्लेखनीय होतं. 6-7 वर्ष आम्ही एकत्र काम केलं होतं", अशी प्रतिक्रिया अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, नितीन देसाई यांच्यावर मे महिन्यात एका अँड एजन्सीने 51.7 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. एजन्सीने तीन महिने काम करूनही नितीन देसाई यांनी त्यांना पैसे दिले नसल्याचं सांगितलं होतं. परंतु तेव्हा नितीन देसाई यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. याआधीही एजन्सीनं आपल्यावर असे आरोप लावल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
view commentsLocation :
First Published :
August 02, 2023 10:12 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Nitin Desai : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं आयुष्य; कलाविश्वात खळबळ


