आता तुम्ही विचार करत असाल की असं काय घडलं असेल ज्यामुळे लोक एवढी चर्चा करत आहेत? मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यासोबत काय केलं असेल? चला थोडं सविस्तर जाणून घेऊ.
ही घटना ऑक्टोबर महिन्यात एका प्रसिद्ध ज्वेलरी शॉपमध्ये घडली. दुकानातील एक तरुण सेल्समन टेबल हलवत असताना, चुकून जेडच्या (Jade) बांगड्यांचं बॉक्स खाली पडला. बॉक्स पडताच सुमारे 30 हून अधिक बांगड्यांचे तुकडे-तुकडे झाले. घडलेली संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. त्यावेळी घाबरुन दुकानातील कर्मचारी तुटलेल्या बांगड्यांचे तुकडे गोळा करत होते.
advertisement
या बॉक्समध्ये जवळपास 50 रशियन नेफ्राइट जेड बांगड्या होत्या, ज्यांची एकूण किंमत सुमारे 10 लाख युआन (भारतीय चलनात सुमारे ₹1.24 कोटी) होती. या सर्व बांगड्यांचा विमा देखील केलेला नव्हता. त्यामुळे नुकसान थेट मालक चेंग (Cheng) यांच्यावर आलं.
इतकं मोठं नुकसान होऊनही मालक चेंग यांनी कर्मचाऱ्याला एक शब्दही सुनावला नाही. उलट त्यांनी सांगितलं की, ही चूक खरंतर त्यांच्या स्वतःच्या विनंतीवरच घडली. कारण त्यांनी आणि एका ग्राहकाने दुकानातील टेबल हटवण्यास सांगितलं होतं. चेंग म्हणाले, “तो मुलगा नवीन आहे. त्याला शिक्षा देण्यापेक्षा मी त्याला समजावलं की, प्रत्येक चूक एक शिकवण असते.”
याचबरोबर त्यांनी ठरवलं की तुटलेल्या बांगड्या फेकून न देता दुकानातच सजावटीसाठी ठेवाव्यात, जेणेकरून ही घटना कायम लक्षात राहील आणि सर्वांना संयम आणि जबाबदारीचं महत्त्व कळेल. ही संपूर्ण घटना चीनमधील आहे.
घटनेच्या वेळी दुकानात प्रसिद्ध चीनी अभिनेता तान काई (Tan Kai) देखील उपस्थित होते. त्यांनीच व्हिडिओ शूटसाठी टेबल हटवण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनाही या घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वत: घेतली. त्यांनी सांगितलं, “जर मी टेबल हलवायला सांगितलं नसतं, तर हे घडलं नसतं. आता मी विचार करतोय की या तुटलेल्या जेडपासून काही सुंदर वस्तू बनवून नुकसान कमी कसं करता येईल.”
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, लोकांनी मालक चेंग यांच्या समजूतदारपणाचं आणि माणुसकीचं कौतुक केलं. चीनी प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ 30 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला. अनेकांनी सुचवलं की तुटलेल्या जेडच्या तुकड्यांपासून बीड्स, नेकलेस किंवा ब्रेसलेट बनवून पुन्हा विक्री करावी म्हणजे नुकसानाचं रूपांतर सुंदर संधीमध्ये होईल.
