TRENDING:

Kitchen Jugaad Video : फक्त पाण्याने मिळवा डास आणि झुरळांपासून सुटका, 10 वर्षे घरात दिसणारच नाहीत

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : पाण्याने तुम्हाला डास, अगदी झुरळांपासूनही सुटका मिळेल, असं सांगितलं तर... साहजिकच विश्वास बसणार नाही. या जबरदस्त असा किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  पावसाळा म्हटलं की डास आलेच. झुरळं तर वर्षाचे 12 महिने घरात दिसतात. कितीही स्वच्छता करा. काही फरक पडत नाही. तसं पाहायला गेलं तर डासांची उत्पती पाण्यातच होते. पण याच पाण्याने तुम्हाला डास, अगदी झुरळांपासूनही सुटका मिळेल, असं सांगितलं तर... साहजिकच विश्वास बसणार नाही. या जबरदस्त असा किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

फक्त पाण्याच्या मदतीने डास आणि झुरळांपासून सुटका मिळवण्याचा जुगाड एका महिलेने दाखवला आहे. तिने व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये या उपायाने 10 वर्षे डास, झुरळं घरात दिसणार नाहीत. असा दावा केला आहे. आता नेमकं हे कसं शक्य आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.

Kitchen Jugaad Video : बटाट्याला छेद करून त्यात एक गोष्ट टाका, 5 वर्षे उंदीर घरात दिसणार नाही

advertisement

महिलेने सांगितल्यानुसार यासाठी एक्सपायरी औषधं जमा करून ठेवा. 4-5 गोळ्या घ्या. याची पावडर बनवून घ्या. ही पावडर एका भांड्यात घ्या. पूजेत वापरलं जाणारं 3 कापूर गोळी घेऊन त्याचीही पूड करून गोळ्यांच्या पावडरमध्ये मिक्स करा. याचा वास इतका तीव्र असतो की डास आणि झुरळांनाही तो सहन होत नाही. आता यात चिमूटभर किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा, कोणतंही हँडवॉश टाकून मिक्स करा. एक पेस्ट तयार होईल. पेस्ट घट्ट असेल तर तुम्ही यात थोडं पाणी टाकू शकता.

advertisement

आता कोमट किंवा साधं पाणी घ्या. तयार केलेलं मिश्रण या पाण्यात टाका. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. स्प्रे बॉटल नसेल तर साध्या बाटलीच्या झाकणाला छेद करून ती वापरा. व्हिडीओत दाखवल्यानुसार स्प्रेचा वापर करा.

आता जिथं तुम्ही स्प्रे वापरू शकत नाही. त्यासाठी महिलेने दुसरा उपायही सांगितला आहे. कागद घ्या त्याचे छोटे तुकडे करा. आणि तयार केलेलं मिश्रण या तुकड्यांवर ठेवा. असाच पेपर उचलून तुम्ही तुम्हाला हवं तिथं ठेवू शकता. जिथं डास आणि झुरळं जास्त असतात. बाहेर जाऊन मरतील. शक्यतो हे रात्रीच्या वेळीच करा. लहान मुलं असतील आणि त्यांनी याला हात लावून तोंडात घातलं तर त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

advertisement

Kitchen Jugaad Video : 5 वर्षे एकही उंदीर घरात दिसणार नाही, उंदरांपासून सुटकेसाठी घरगुती उपाय

(सूचना : हा लेख सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीने जो फक्त माहितीसाठी दिला आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : फक्त पाण्याने मिळवा डास आणि झुरळांपासून सुटका, 10 वर्षे घरात दिसणारच नाहीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल